ASEAN-India Summit : पंतप्रधान मोदी आज जकार्ताला रवाना होणार, आसियान-भारत शिखर परिषदेत सहभागी होणार


पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत G20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. राजधानी दिल्लीत ९-१० सप्टेंबर रोजी शिखर परिषद होणार आहे. पण त्याआधी पंतप्रधान मोदी ६ आणि ७ सप्टेंबर रोजी जकार्ता येथे आसियान-भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इंडोनेशियाला जाणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोदी जकार्तामध्ये काही तासच राहणार आहेत. PM Modi will leave for Jakarta today to attend the ASEAN-India Summit

पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यात प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. पहिला मुद्दा सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी अजेंडा तयार करण्याचा असेल. दुसरे, भारत आणि आसियान यांच्यातील व्यापाराला गती देणे. तिसरे, चीनने जाहीर केलेल्या नवीन नकाशाबाबत आसियान देशांशी चर्चा करणे. पंतप्रधानांच्या या भेटीबाबत भारतीय राजदूत म्हणाले की, यातून जागतिक स्तरावर एक संदेश जाईल की भारत आपल्या क्षेत्राला आणि आसियान केंद्रस्थानाला किती महत्त्व देतो.

‘Prime Minister Of Bharat’-

दरम्यान, ‘INDIA’ ऐवजी ‘भारत’ वापरण्यावरून राजकीय वाद सुरू आहे. पहिल्या G-20 परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांना डिनरसाठी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकांमध्ये भारत शब्दाचा वापर करण्यात आला होता. त्याचबरोबर आसियान शिखर परिषदेच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणात ‘Prime Minister Of INDIA’ ऐवजी ‘Prime Minister Of Bharat’ असा उल्लेख करण्यात आला आहे. संबित पात्रा यांनी हे पत्र ट्विट केले आहे.

PM Modi will leave for Jakarta today to attend the ASEAN-India Summit

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!