PM Modi : पंतप्रधान मोदींनी दिल्ली विमानतळावर कतारचे अमीर शेख यांचे केले स्वागत

PM Modi

कतारचे अमीर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : PM Modi  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची प्रेमाने भेट घेतली.PM Modi

“माझे बंधू, कतारचे अमीर, महामहिम शेख तमीम बिन हमद अल थानी यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलो होतो.” असे पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे सांगितले. तसेच मी त्यांना भारतातील यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि मंगळवारी होणाऱ्या आमच्या भेटीची वाट पाहतो आहे. असंही मोदींनी म्हटलं आहे.



कतारचे अमीर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळाचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. यापूर्वी, ते मार्च २०१५ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. तर आज (१८ फेब्रुवारी) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल.

आपल्या दौऱ्यादरम्यान, आमीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. तर, राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले आहे. त्या ठिकाणीच कतारचे अमीर पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करतील.

भारत आणि कतार यांच्यात मैत्री, विश्वास आणि परस्पर आदराचे खोल ऐतिहासिक संबंध आहेत. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि लोकांमधील संबंध सातत्याने मजबूत झाले आहेत.

PM Modi welcomes Emir Sheikh Tamim bin Hamad Al Thani of Qatar at Delhi airport

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात