उद्योग संघटनांकडून समाधान व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक होता. असे मत ASSOCHAM आणि फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्स (FIEO) या आघाडीच्या उद्योग संघटनांनी व्यक्त केले आहे.PM Modi
ASSOCHAMचे अध्यक्ष संजय नायर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या बैठकीनंतर जारी केलेले संयुक्त निवेदन भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या सततच्या विश्वासाचे आणि ताकदीचे प्रतीक आहे.
तसेच पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीतून अनेक ठोस परिणाम समोर आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये संरक्षण, दहशतवादविरोधी लढा, जीवाश्म इंधन आणि अणुऊर्जा, दोन्ही देशांना व्यापणारी ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक यांचा समावेश आहे. याशिवाय भारताच्या मानवी भांडवलाचा वापर करण्यासाठी सहकार्य मजबूत करणे समाविष्ट आहे. तसेच आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे वर्षाच्या अखेरीस एआय पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी अमेरिका-भारत रोडमॅप विकसित करणे होय.
तर FIEO चे अध्यक्ष अश्वनी कुमार यांच्या मते, ही भेट दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य, व्यापार विस्तार, गुंतवणुकीला चालना आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. भारत आणि अमेरिकेतील वाढत्या आर्थिक संबंधांमध्ये ही चर्चा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका भारताच्या सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांपैकी एक म्हणून उदयास येत आहे. या घडामोडींमुळे भारतीय निर्यातदारांना नवीन संधी उपलब्ध होतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App