PM Modi जी BRICS ट्रम्प मोडायला सांगत होते, त्याच BRICS मधून मोदींनी महासत्तांना सुनावले…

PM Modi

ज्या संघटनेचे संदर्भमूल्य संपलेय, जी संघटना अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोडून टाकयला सांगत होते, त्याच BRICS संघटनेच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेसकट जागतिक महासत्तांना सुनावले, की तुम्ही काळानुसार सुधारा. Political willpower दाखवा, जागतिक संघटना आणि संस्था यांच्यात सगळ्या प्रभावशाली देशांना सामावून घ्या, नाहीतर तुमची अवस्था सीमकार्ड असलेल्या पण नेटवर्क नसलेल्या मोबाईल फोन सारखी होऊन जाईल!! PM Modi

ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या BRICS संघटनेची शिखर बैठक ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरो मध्ये सुरू झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुरुवातीचे भाषण झाले. या भाषणादरम्यान मोदींनी अमेरिकेसकट सगळ्या महासत्तांना परखड शब्दांमध्ये सुनावले.

BRICS संघटना चीनच्या जास्त प्रभावाखाली आहे. या संघटनेमार्फत चीन अमेरिकेच्या डॉलरला पर्याय ठरू शकेल, अशी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था उभी करू पाहत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करून देखील चीनला अजून त्यामध्ये यश आलेले नाही. BRICS यापुढे देखील यश येणार नाही. त्यामुळे ही संघटना मोडीत काढावी, अशी दमबाजी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.

मात्र चीन सकट BRICS सदस्य देशांनी ही दमबाजी बिलकुल ऐकली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणामध्ये जागतिक पार्श्वभूमीचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दमबाजीचे प्रतिबिंब पडले होते.

– पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

– विसाव्या शतकामध्ये ज्या जागतिक संघटना आणि संस्था उभ्या केल्या गेल्या, त्यामध्ये विशिष्ट देशांचाच प्रभाव राहिला. जगातल्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या असणाऱ्या देशांना त्यामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नाही. आज त्याच लोकसंख्येचे देश जागतिक अर्थकारणावर मोठा प्रभाव टाकत आहेत. पण त्यांना जागतिक व्यासपीठाच्या निर्णय प्रक्रियेत अजूनही सामावून घेतले जात नाही.

– यातला सवाल फक्त प्रतिनिधित्वाचा नाही तर जागतिक संस्थांच्या विश्वासार्हतेचा आणि उपयुक्ततेचा आहे. जगातल्या दोन तृतीयांश लोकसंख्या असलेल्या देशांना जागतिक संस्था आणि संघटनांच्या निर्णय प्रक्रियेतून बाजूलाच ठेवले तर त्या संस्थांची अवस्था सिम कार्ड असलेल्या पण नेटवर्क नसलेल्या मोबाईल सारखी होऊन जाईल.

– BRICS मध्ये नवीन सदस्य जोडले गेले, याचा अर्थच आपली संघटना काळानुसार बदलते नव्या सदस्यांना सामावून घेते, हे सिद्ध झाले. आता आपण सगळ्यांनी political willpower दाखवून संयुक्त राष्ट्रसंघाची सुरक्षा समिती, जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँका यांच्यात अमुलाग्र बदल घडवून आणले पाहिजेत. नव्या सदस्यांना निर्णय प्रक्रियेत अधिकार देऊन सामावून घेतले पाहिजे. निवडक प्रगत देशांचे वर्चस्व संपविले पाहिजे.

– मोदींच्या भाषणाचे महत्त्व

डोनाल्ड ट्रम्प हे भारताला आणि BRICS सदस्य देशांना ती संघटनाच मोडून टाकायला सांगत होते पण प्रत्यक्षात त्याच संघटनेच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आणि जागतिक महासत्तांना इतर जागतिक संस्था आणि संघटना यांच्यात काळानुसार सुधारणा घडवून आणायचे सुनावले.

भारताचे ऑपरेशन सिंदूर त्यामध्ये अमेरिकेने केलेला वेगवेगळ्या हस्तक्षेप चीनने दाखविलेला शत्रूभाव या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी BRICS सदस्य देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून प्रथमच आक्रमकपणे अमेरिकेसकट चीन आणि रशिया या विकसित देशांना देखील सुनावून घेतले. त्यामुळे मोदींच्या आजच्या भाषणाला जागतिक पातळीवर विशेष महत्त्व आले.

PM Modi target superpowers in BRICS meeting in Brazil

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात