विशेष प्रतिनिधी
भोपाळ : 2007 मध्ये आपल्या दिशेने आलेल्या “मौत के सौदागर” या मिसाईलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मूर्खों के सरदार” या अँटी मिसाईलने उत्तर दिले. पण त्यासाठी मोदींनी तब्बल 16 वर्षे घेतली.PM Modi takes a jibe at rahul gandhi as knight or stupids
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत 2007 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियम मध्ये झालेल्या सभेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना उद्देश “मौत के सौदागर” अशी टीका केली होती. त्या टीकेचे उत्तर मोदींनी नव्हे, तर गुजरातच्या जनतेने तेव्हा प्रत्यक्ष कृतीतून दिले होते. त्यांनी मोदींच्या पारड्यात भरभरून मते टाकली आणि काँग्रेसचा पराभव केला. मोदींनी ती टीका लक्षात ठेवली आणि आता 2023 च्या मध्य प्रदेश निवडणुकीत त्या टीकेची परतफेड केली. काँग्रेस नेतृत्वाला उद्देशून त्यांनी “मूर्खों के सरदार” अशी प्रतिटीका केली.
काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मध्य प्रदेशातल्या प्रचार सभेत तुम्हाला भारतात सगळीकडे फक्त “मेड इन चायना” हे दिसते. तुमचा मोबाईल, तुमचा शर्ट, तुमचे बूट या सगळ्यावर “मेड इन चायना” लिहिल्याचे दिसते. पण काँग्रेसला सत्तेवर आल्यानंतर ते बदलून “मेड इन मध्य प्रदेश” असे लिहायचे आहे. मध्य प्रदेशातल्या बेरोजगार युवकांना रोजगार द्यायचा आहे, असे उद्गार काढले होते. त्यांच्या या उद्गारावरूनच मोदींनी राहुल गांधींना “मूर्खों के सरदार” असे संबोधले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे एक महाज्ञानी नेते नुकतेच इथे येऊन गेले. त्यांना देशातल्या “मेक इन इंडिया” योजनेचा पत्ताच नाही. भारतात किती बदल झाला आहे, भारताच्या अचिव्हमेंट्स किती मोठ्या आहेत, याविषयी त्यांना काहीच माहिती नाही. त्यांनी डोळ्यावर जो विदेशी चष्मा चढवलाय त्यातून त्यांना अजूनही सगळीकडे “मेड इन चायना” दिसते. पण आज भारतात मोबाईलची निर्मिती तब्बल 3.50 लाख कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. त्यातले 1 लाख कोटी रुपयांचे मोबाईल भारत निर्यात करतो. त्याआधी काँग्रेसच्या राजवटीत फक्त 20000 कोटी रुपयांच्या मोबाईलची निर्मिती भारतात होत होती, याचे मूर्खांच्या सरदाराला भानच नाही, अशी तोफ पंतप्रधान मोदींनी डागली.
पंतप्रधान मोदींच्या तोंडून पहिल्यांदाच “मौत के सौदागर” या टीकेला “मूर्खों के सरदार” या शब्दांनी प्रत्युत्तर मिळाले, पण त्यासाठी मोदींनी तब्बल 16 वर्षे घेतली!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App