पंतप्रधान मोदींनी तेजस लढाऊ विमानातून घेतली भरारी; ‘HAL’ फॅसिलिटी सेंटरची केली पाहणी

उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली अन् म्हटले की…


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बंगळुरू येथे तेजस विमानातून उड्डाण केले. मोदी आज बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या फॅसिलिटी सेंटरला पोहोचले. पीएमओच्या म्हणण्यानुसार, त्यांनी तेजसच्या मॅन्युफॅक्चरिंग हबची पाहणी केली.PM Modi take off from Tejas fighter jet Inspected HAL Facility Centre

उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यांनी लिहिले, ‘तेजसचे उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा अनुभव अविश्वसनीय होता. या अनुभवाने आपल्या देशातील स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. यामुळे माझ्यामध्ये आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावाद जागृत झाला आहे.



देशाची संरक्षण सज्जता आणि स्वदेशीकरण वाढवण्यासाठी सरकारने उचललेल्या मोठ्या पावलांमध्ये तेजस विमानाचाही समावेश आहे. 2016 मध्ये पहिले विमान हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते. सध्या IAF चे दोन स्क्वॉड्रन, 45 स्क्वॉड्रन आणि 18 स्क्वॉड्रन LCA तेजस सोबत पूर्णपणे कार्यरत आहेत.

PM Modi take off from Tejas fighter jet Inspected HAL Facility Centre

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात