PM Modi Speech Today : कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने देशापुढे मोठे संकट निर्माण केले आहे. दररोज 2.5 लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना विश्वास दिला की, कोरोनाबाबत जी पावले उचलण्यात आली आहेत, त्यामुळे निश्चितच परिस्थिती सुधारेल. PM Modi Speech Today To Nation On Coronavirus Vaccination and Cases
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने देशापुढे मोठे संकट निर्माण केले आहे. दररोज 2.5 लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित करताना विश्वास दिला की, कोरोनाबाबत जी पावले उचलण्यात आली आहेत, त्यामुळे निश्चितच परिस्थिती सुधारेल.
लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, राज्य प्रशासनांना माझी विनंती आहे की, श्रमिकांना, मजूरांना विश्वासात घ्या. त्यांनी जिथे आहेत तिथेच राहण्याचे आवाहन करा. राज्यांनी दिलेला हा विश्वास त्यांना मदत करेल. ते ज्या शहरात आहेत त्या शहरात काही दिवसांत लसीकरण केले जाईल आणि त्यांचे कामही थांबणार नाही.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र एक करून अतिशय कमी वेळात देशवासीयांसाठी लसी तयार केल्या आहेत. आज जगात सर्वात स्वस्त लस भारतात आहे. भारताच्या कोल्ड चेन सिस्टमला अनुकूल लस आपल्याकडे आहे. ते म्हणाले की, कोरोनाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे परिस्थिती निश्चितच सुधारेल.
Addressing the nation on the COVID-19 situation. https://t.co/rmIUo0gkbm — Narendra Modi (@narendramodi) April 20, 2021
Addressing the nation on the COVID-19 situation. https://t.co/rmIUo0gkbm
— Narendra Modi (@narendramodi) April 20, 2021
पूर्वी परिस्थिती वेगळी होती, आता आम्ही अधिक मजबूत आहोत करोनाच्या पहिल्या लाटेशी तुलना करताना पंतप्रधान म्हणाले की, आधी परिस्थिती वेगळी होती. पूर्वी आपच्याकडे पायाभूत वैद्यकीय सुविधा नव्हत्या. पीपीई किट तयार होत नव्हते, रोगावर उपचार करण्याबाबत जास्त माहिती नव्हती. पण आम्ही लवकरच या क्षेत्रात प्रवेश केला. आज आमच्याकडे पीपीई किट्स मोठ्या प्रमाणात आहेत. लॅबचे एक मोठे जाळे आहे आणि आम्ही चाचणी सुविधा सतत वाढवत आहोत.
प्रत्येक गरजूंना लस देण्यावर भर द्या लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक क्षेत्रात गरजूंना लस द्याव्यात यावर भर देण्यात आला. आज कोरोनाबरोबरच्या या लढाईत आमचे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या संख्येला लसी देण्यात आल्यानं आम्हाला प्रोत्साहन मिळालं आहे. आम्ही आता 1 मेपासून 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे.
भारतात जगातील सर्वात स्वस्त लस गतवर्षी कोरोनाचा उद्रेक सुरू होताच आपल्या देशात कोरोनाविरुद्ध प्रभावी लस तयार करण्याचे काम सुरू झाले. आज जगात सर्वात स्वस्त लस भारतात आहे. आपच्याकडे कोल्ड चेन सिस्टिमला अनुकूल अशी लस आहे. खासगी क्षेत्राने या कामात चमकदार कामगिरी केली.
आपचे फार्मा क्षेत्र खूप मजबूत पंतप्रधान म्हणाले की, या वेळी कोरोनाची प्रकरणे जसजशी वाढली तसतसे औषधांचे उत्पादनही वाढले. ते म्हणाले की, आज पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त औषधे तयार केली जात आहेत, उत्पादन वेगवान केले जात आहे. आमच्याकडे एक अतिशय मजबूत फार्मा क्षेत्र आहे, जे जलदगतीने आणि चांगली औषधे तयार करते.
ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न यावेळच्या कोरोना संकटात देशाच्या बर्याच भागात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. याबाबत पूर्ण संवेदनशीलतेसह वेगाने पावले उचलली जात आहेत. केंद्र, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्र सर्व गरजूंना ऑक्सिजन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत.
डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त कोरोना संकटात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांचे पंतप्रधानांनी आभार मानले. देश पुन्हा एकदा संकटाला सामोरे जात असताना आपण तीच भूमिका निभावली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
PM Modi Speech Today To Nation On Coronavirus Vaccination and Cases
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App