संतापजनक : रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली खारट पाण्याची विक्री, पोलिसांनी टोळक्याला केलं जेरबंद

Mysore police busted a racket selling saltwater in the name of remdesivir injection

Remdesivir Injection : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचाही आकडा वाढत आहे. यात कहर म्हणजे देशात रेमडिसिव्हिर इंजेक्शनची कमतरता आहे. यामुळे या इंजेक्शनचा काळा बाजारही जोरात सुरू आहे. कर्नाटकातून असेच एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे. म्हैसूरमध्ये एक टोळी रेमडिसिव्हिर इंजेक्शनच्या नावाखाली कुपीमध्ये खारट पाणी आणि प्रतिजैविक औषध टाकून विक्री सुरू होती. याप्रकरणी एका परिचारिकाला अटक करण्यात आली आहे. Mysore police busted a racket selling saltwater in the name of remdesivir injection


विशेष प्रतिनिधी

म्हैसूर : देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने चिंताजनक परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक राज्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचाही आकडा वाढत आहे. यात कहर म्हणजे देशात रेमडिसिव्हिर इंजेक्शनची कमतरता आहे. यामुळे या इंजेक्शनचा काळा बाजारही जोरात सुरू आहे. कर्नाटकातून असेच एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे. म्हैसूरमध्ये एक टोळी रेमडिसिव्हिर इंजेक्शनच्या नावाखाली कुपीमध्ये खारट पाणी आणि प्रतिजैविक औषध टाकून विक्री सुरू होती. याप्रकरणी एका परिचारिकाला अटक करण्यात आली आहे.

रेमडिसिव्हिर या जीवनरक्षक औषधाची मागणी कोरोनाच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे वाढली आहे. म्हैसूर पोलिसांना या बनावट रेमडिसिव्हिर इंजेक्शनची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून कारवाई केली. या घटनेबाबत म्हैसूरचे पोलीस आयुक्त चंद्रगुप्त यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

या फ्रॉडचा मुख्य सूत्रधार गिरीश नावाची एक व्यक्ती आहे. तो व्यवसायाने नर्स आहे. पोलीस आयुक्त चंद्रगुप्त म्हणाले की, विविध कंपन्यांकडून रेमडिसिव्हिरच्या बाटल्या रिसायकल करून त्यात अँटिबायोटिक्स आणि सलाईन भरण्यात येत होते. हे बनावट इंजेक्शन्स बाजारात आणण्यात आले. 2020 पासून ही फसवणूक सुरू होती. आम्ही यामुळे झालेल्या परिणामांचाही शोध घेत आहोत. या टोळक्याने कुठे कुठे आपला स्टॉक विकलाय याचीही माहिती घेणे सुरू आहे.

गिरीशने खुलासा केला की, तो मागच्या वर्षापासून आपल्या काही साथीदारांसोबत मिळून हे काम करत आहे. त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी गिरीश हा जेएसएस रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून ड्यूटीवर होता.

Mysore police busted a racket selling saltwater in the name of remdesivir injection

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात