Gurudwara Circuit Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली कल्पना लवकरच प्रत्यक्षात येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव एक विशेष “गुरुद्वारा सर्किट” रेल्वे सुरू करणार आहेत, देशभरातील भाविकांना याचा लाभ मिळेल. PM Modi Special Gift to Sikhs A Special Cross country Gurudwara Circuit Train Journey
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली कल्पना लवकरच प्रत्यक्षात येत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव एक विशेष “गुरुद्वारा सर्किट” रेल्वे सुरू करणार आहेत, देशभरातील भाविकांना याचा लाभ मिळेल. अमृतसरपासून सुरू होणारा आणि अमृतसरलाच संपणाऱ्या या 11 दिवसांच्या प्रवासात हरमिंदर साहिब, बिहारची राजधानी पाटणामधील पाटणा साहिब, महाराष्ट्रातील नांदेडमधील हजूर नांदेड साहेब आणि भटिंडामधील दमदमा साहिब यासह किमान चार प्रमुख गुरुद्वारांचा समावेश असेल. या ट्रेनमध्ये अंबाला, सहारनपूर, लखनऊ, मनमाड, सुरत, अहमदाबाद, जयपूर, भटिंडा आणि अमृतसरसह अनेक थांबे असतील.
या विशेष रेल्वेत स्लीपर क्लास आणि वातानुकूलित क्लाससह 16 डबे असतील. एसी क्लासमधील प्रवाशासाठी प्रवासाचा दर प्रति दिन 900 ते 1000 रुपयांपर्यंत असेल. ही सर्किट ट्रेन लीजिंग मॉडेलवर चालवली जाईल. भाडेपट्टीचा कालावधी किमान पाच वर्षे असेल. ट्रेनच्या अंतर्गत देखभालीसाठी ऑपरेटर जबाबदार असेल, तर बाह्य देखभाल आणि दुरुस्तीचे काम भारतीय रेल्वेकडे घेतले जाईल. रेल्वेचे डबे अत्याधुनिक असतील ज्यात सर्व शीख गुरूंची छायाचित्रे असतील आणि प्रवासादरम्यान स्पीकरवर गुरबाणीही ऐकवली जाईल.
या प्रवासात प्रवाशांच्या जेवणासाठी ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार असेल. प्रवासादरम्यान फक्त शाकाहारी जेवण मिळेल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात कराराचे धोरण लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे आणि रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनुसार, ही सर्किट ट्रेन नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस कार्यान्वित होऊ शकते.
Hon'ble PM Shri @narendramodi Ji's concept of an exclusive state-of-the-art is a sacred 11-day pilgrimage train called the "Gurudwara Circuit" that connects four renowned Gurudwara sahib across India.https://t.co/gDfyS6pqqp — Dr. Ramesh Pokhriyal Nishank ( Modi Ka Parivar) (@DrRPNishank) September 10, 2021
Hon'ble PM Shri @narendramodi Ji's concept of an exclusive state-of-the-art is a sacred 11-day pilgrimage train called the "Gurudwara Circuit" that connects four renowned Gurudwara sahib across India.https://t.co/gDfyS6pqqp
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank ( Modi Ka Parivar) (@DrRPNishank) September 10, 2021
देशातील आणि अगदी परदेशातूनही विशेषत: सुट्टीच्या मोसमाच्या काळात गुरुद्वारांना भरपूर पर्यटक येतात. या वस्तुस्थितीमुळे या सर्किटला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे केवळ रेल्वेलाच नव्हे, तर पर्यटन आणि सांस्कृतिक, उद्योगालाही चालना मिळेल. लीजिंग धोरण जाहीर होण्याआधीच, रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, किमान 40 ते 45 मोठ्या टूर ऑपरेटर्सनी सर्किट भाडेतत्त्वावर घेण्यास स्वारस्य दाखवले आहे.
PM Modi Special Gift to Sikhs A Special Cross country Gurudwara Circuit Train Journey
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App