वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत ४५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. दरम्यान, पंतप्रधानांनी सत्ताधारी आम आदमी पक्षावर (आप) निशाणा साधत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. अशोक विहारमध्ये आयोजित सभेत मोदी म्हणाले, गेल्या १० वर्षांपासून दिल्लीला एका मोठ्या आपत्तीने घेरले आहे. अण्णा हजारे यांना समोर ठेवून काही कट्टर अप्रामाणिक लोकांनी दिल्लीला आपत्तीत ढकलले आहे.
पीएम म्हणाले, दारूच्या दुकानात घोटाळा, मुलांच्या शाळांमध्ये घोटाळा, गरिबांच्या उपचारात घोटाळा, नोकर भरतीच्या नावावर घोटाळा… हे लोक दिल्लीच्या विकासाच्या गप्पा मारायचे, पण ते आपत्ती झाले आहेत. ते चोरीही करतात आणि सिरजोरीही करतात. पंतप्रधान म्हणाले, दिल्लीतील जनतेला या आपत्तीग्रस्त सरकारला सत्तेवरून हटवायचे आहे. पंतप्रधान म्हणाले, ‘दिल्लीच्या मतदारांनी दिल्लीला संकटातून मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक नागरिक म्हणत आहे की, ते आपत्ती खपवून घेणार नाहीत, बदलासोबत राहूू. हे वर्ष राष्ट्र उभारणीचे नवे राजकारण घेऊन येईल.
अशोक विहारमध्ये झोपडपट्टीवासीयांसाठी बांधलेल्या स्वाभिमान अपार्टमेंटला पंतप्रधानांनी भेट दिली. १,६७५ फ्लॅटच्या चाव्या सुपूर्द केल्या. म्हणाले, दिल्लीतील जनतेला या आपत्तीग्रस्त सरकारला सत्तेवरून हटवायचे आहे
विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
आपत्ती सरकार आयुष्मान योजना राबवू देत नाही
पीएम म्हणाले, दिल्लीतील ५०० जन औषधी केंद्रांवर स्वस्त औषधे उपलब्ध झाल्याने दरमहा हजारो लोकांची बचत होत आहे. मला आयुष्मान योजनेत मोफत उपचार द्यायचे आहेत, पण आपत्ती सरकार ती लागू करू देत नाही.
केजरीवाल म्हणाले- भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा व निवडणूकीसाठी नॅरेटिव्ह नाही
भाजपवर प्रत्युत्तर देताना आपचे संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले की, गेल्या १० वर्षांत केंद्राने दिल्लीत काही काम केले असते तर पंतप्रधानांनी आपल्या ४३ मिनिटांच्या भाषणातील ३९ मिनिटे राजधानीतील लोकांना आणि त्यांच्याद्वारे निवडलेल्या सरकारला शिव्याशाप देण्यात घालवली नसती. केजरीवाल म्हणाले, ‘पंतप्रधानांनी अनेकदा सांगितले, दिल्लीवर आपत्ती कोसळली आहे. आपत्ती दिल्लीत नाही तर भाजपवर आली आहे. पहिली आपत्ती- भाजपकडे मुख्यमंत्री चेहरा नाही. दुसरी आपत्ती – त्यांच्याकडे निवडणुका लढवण्यासाठी कोणतेच नॅरेटिव्ह नाही. तिसरी आपत्ती दिल्लीवर आहे. येथे गँगस्टर गोळ्या चालवत आहेत. व्यापारी रडत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App