पंतप्रधान मोदींनी 2019 मध्येच विरोधकांना दिले होत्या, 2023 मध्ये अविश्वास ठराव आणण्याच्या “शुभेच्छा”!!; व्हिडिओ व्हायरल


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या मुदतीच्या अखेरच्या वर्षात 2023 मध्ये आज 26 जुलै रोजी काँग्रेस सह सर्व विरोधी पक्ष लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडत आहे. PM Modi punched the opposition to bring no trust motion in 2023

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2023 मध्ये विरोधकांनी अविश्वास ठराव आणावा अशा शुभेच्छा 2019 मध्ये दिले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 7 जून 2019 रोजी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना या “शुभेच्छा” दिल्याचे लोकसभा टीव्हीतल्या फुटेज वरून दिसत आहे.

यात पंतप्रधान मोदी विरोधकांना उद्देशून, तुम्ही इथून पुढे एवढी मोठी तयारी करा की 2023 मध्ये तुम्ही पुन्हा एकदा सरकारी विरुद्ध अविश्वास ठराव आणू शकाल, असे सांगताना दिसत आहेत.

त्याचवेळी विरोधी बाकांवरून मल्लिकार्जुन खर्गे हा तुमचा अहंकार बोलतोय असे म्हणताना दिसत आहेत. त्यालाही पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे. अहंकारामुळे 400 वरून 40 झालात आणि सेवाभाव समर्पपणामुळे आम्ही 2 वरून सत्ताधारीबाकांवर येऊन बसलो, असे पंतप्रधान मोदींनी मल्लिकार्जुन खर्गे यांना सुनावल्याचे दिसत आहेत.

PM Modi punched the opposition to bring no trust motion in 2023

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात