विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघावर (WFI) वर्चस्व राखून असलेल्या ब्रजभूषण सिंह आणि त्यांचा परिवार आता कुस्ती महासंघाच्या निवडणुकीच्या परिघाबाहेर फेकला गेला आहे. कुस्ती महासंघाच्या मतदार यादीतून ब्रशभूषण सिंह यांचा मुलगा करन प्रताप सिंह आणि एक जावई यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. विशाल सिंह हा दुसरा जावई मतदार यादीत नाव टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. मात्र विशाल सिंह यांना कुस्ती महासंघाचे कोणतेही महत्त्वाचे पद भूषविता येणार नाही. बिहार कुस्ती महासंघाचा अध्यक्ष या रूपाने विशाल सिंह यांचे नाव मतदार यादीत टिकले आहे.Brji bhushanout of WFI poll fray but son in low in
महिला पैलवानांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे ब्रजभूषण सिंह आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले. ते आता कुस्ती महासंघाच्या मतदार यादीतूनही बाहेर फेकले गेल्यामुळे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कुस्ती महासंघावरचे वर्चस्व ढिल्ले पडून इतिहासजमा होत आहे. ब्रजभूषण सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांचाच मुलगा करण प्रताप सिंह हा कुस्ती महासंघाचा सचिव होता. आता भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका झाल्यानंतर बज्रभूषण सिंह यांच्या परिवारापैकी कोणीही महासंघाच्या कोणत्याही महत्त्वाच्या पदावर उरणार नाही.
पवारनिष्ठांचेही वर्चस्व मोडीत
त्याचवेळी महाराष्ट्रातूनही एकाही पदाधिकाऱ्याचे नाव मतदार यादीत नसल्यामुळे महाराष्ट्रातली वादग्रस्त कार्यकारणी देखील अखिल भारतीय पातळीवर कुस्ती महासंघात शिरकाव करू शकणार नाही. महाराष्ट्राच्या कुस्ती महासंघावर पवारनिष्ठांचे वर्चस्व होते. ते ब्रजभूषण सिंह यांनी मोडून काढले होते. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीनंतर संपूर्ण नवी कार्यकारिणी कार्यभार हातात घेईल
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more