या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज पुलवामा हल्ल्याच्या घटनेची पाचवी वर्षपूर्ती आहे. 14 फेब्रुवारी 2019 रोजी या दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे घडली. या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.PM Modi paid tribute to martyrs of Pulwama
मोदींनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले, ‘मी पुलवामामध्ये शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. देशासाठी त्यांची सेवा आणि त्याग सदैव स्मरणात राहील. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनांना लक्ष्य केले. ज्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते.
पुलवामा हल्ला हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक होता. ज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय जवान शहीद झाले. हा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी 200 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ताफ्याला लक्ष्य केले. पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथून जात असताना दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनांवर आत्मघाती हल्ला केला. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर घुसवली. त्यामुळे मोठा स्फोट झाला आणि जवानांच्या वाहनांचे तुकडे झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App