PM मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर; पिथौरागढमध्ये 4200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार, आदि कैलासचे घेणार दर्शन

वृत्तसंस्था

पिथौरागड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते पिथौरागढ जिल्ह्यात सुमारे 4200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान दोन दिवसांसाठी (11-12 ऑक्टोबर) उत्तराखंडच्या दौऱ्यावर जाणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांचा दौरा केवळ एक दिवसाचा करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी याला दुजोरा दिला आहे.PM Modi on Uttarakhand tour today; Will inaugurate projects worth Rs 4200 crore in Pithoragarh, visit Adi Kailas



पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक…

पंतप्रधान सकाळी 8:30 वाजता पिथौरागढ जिल्ह्यातील जोलिंगकॉंग येथे पोहोचतील, तेथे ते पार्वती कुंड येथे पूजा आणि दर्शन करतील. यानंतर आदि कैलास पर्वताला भेट देतील आणि येथे ध्यान करतील.

नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, जे उत्तराखंडमधील भारत-चीन सीमेवरील आदि कैलास पर्वताला भेट देणार आहेत. यानंतर पंतप्रधान पिथौरागढमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान ज्या ठिकाणाहून कैलास पर्वत पाहतील त्या ठिकाणाचे नाव जोलिंगकॉंग आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 15,000 फूट आहे. इथून 20 किलोमीटर गेल्यावर चीनची सीमा सुरू होते.

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील 18 हजार फूट उंच लिपुलेख पर्वतावरून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसतो. येथून पर्वताचे हवाई अंतर 50 किलोमीटर आहे.

सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान पिथौरागढ जिल्ह्यातील गुंजी गावात पोहोचतील. येथे ते स्थानिक लोकांशी संवाद साधतील, तसेच स्थानिक कला आणि उत्पादनांवर आधारित प्रदर्शनात सहभागी होतील. पंतप्रधान मोदी लष्कर, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) यांच्याशीही संवाद साधतील.

दुपारी 12 वाजता पंतप्रधान जागेश्वर, जिल्हा अल्मोडा येथे जातील. येथे ते जागेश्वर धामला भेट देतील. सुमारे 6200 फूट उंचीवर असलेल्या जागेश्वर धाममध्ये 224 दगडी मंदिरे आहेत. पंतप्रधान दुपारी 2:30 वाजता पिथौरागढ येथे पोहोचतील, जिथे ते ग्रामीण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पिण्याचे पाणी, फलोत्पादन, शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांशी संबंधित सुमारे 4200 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.

पंतप्रधानांच्या भेटीमुळे पर्यटन वाढेल, असे उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणाले

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती दिली. पुष्कर सिंह धामी म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या आगमनाने कुमाऊं विभागात नक्कीच पर्यटन वाढेल.

PM Modi on Uttarakhand tour today; Will inaugurate projects worth Rs 4200 crore in Pithoragarh, visit Adi Kailas

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात