वृत्तसंस्था
नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची महत्त्वपूर्ण बैठक तब्बल ४० वर्षांनी भारतात आणि तीही मुंबईत होत आहे. या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला असून आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीला शुभेच्छा देणारे ट्विट केले आहे.PM Modi expresses happiness over India being chosen the host for 2023 International Olympic Committee Session
या आधीची आंतरराष्ट्रीय ऑलिपिंक समितीची बैठक १९८३ मध्ये झाली होती. इंदिरा गांधी या त्यावेळी पंतप्रधान होत्या आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने १९८२ मध्ये भारतात आशियायी स्पर्धांचे आयोजन केले होते. आताच्या ऑलिंपिकमध्ये भारताची कामगिरी सर्वोत्तम मानली गेली आहे.
PM Modi expresses happiness over India being chosen the host for 2023 International Olympic Committee Session. pic.twitter.com/57UFDZPWVG — ANI (@ANI) February 19, 2022
PM Modi expresses happiness over India being chosen the host for 2023 International Olympic Committee Session. pic.twitter.com/57UFDZPWVG
— ANI (@ANI) February 19, 2022
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ही ऑलिपिंक आयोजनाबाबतची सर्वोच्च संस्था आहे. यामध्ये ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. नुकत्याच चीनची राजधानी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या बैठकीत भारताचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, पहिला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि नीता अंबानी सहभागी झाले होते. त्यांनी १४० व्या बैठकीचे यजमानपद भारतासाठी मिळविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App