मणिशंकर अय्यरांच्या वक्तव्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला समाचार, म्हटले…

ओडिशातील कंधमाल येथे एका सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे’ या काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (11 मे) निशाणा साधला आहे. काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते, सावध राहा, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असे ते म्हणत आहेत. मोदी पुढे म्हणाले की, आज पाकिस्तानची अवस्था अशी आहे की आता त्यांच्यावर अणुबॉम्ब विकण्याची वेळ आली आहे, पण त्यालाही खरेदीदार सापडत नाही.PM Modi criticized Congress over Mani Shankar Aiyars statement



मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे म्हटले होते. आपल्याकडेही बॉम्ब आहेत, पण जर कोणी लाहोरवर बॉम्ब टाकला तर रेडिएशन अमृतसरलाही ८ सेकंदात पोहोचू शकते. पाकिस्तानला आदराने वागवण्याबाबतही ते बोलले. पाकिस्तानचा आदर केला तर तो शांततेने जगेल, असे ते म्हणाले. जर आपण ते नाकारले तर तिथले कोणीतरी भारतावर बॉम्ब टाकण्याचा निर्णय घेऊ शकतो.

ओडिशातील कंधमाल येथे एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, “एक तो दिवस होता जेव्हा भारताने जगाला आपल्या क्षमतेची ओळख करून दिली. दुसरीकडे, काँग्रेस वारंवार आपल्याच देशाला घाबरवण्याचा प्रयत्न करते, की ‘सावध राहा, पाकिस्तानडे अणुबॉम्ब आहे, हे मरतुकडे लोक देशालाही मारत आहेत. काँग्रेसची नेहमीच असेच धोरण राहीले आहे.

ते पुढे म्हणाले, “आज पाकिस्तानची अवस्था अशी झाली आहे की ते बॉम्ब विकायला निघाले आहेत. तेही कोणी विकत घेत नाही. काँग्रेसच्या या दुबळ्या वृत्तीमुळे जम्मू-काश्मीरमधील जनता 60 वर्षांपासून दहशतीखाली होती. देशाने इतक्या दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे की तो विसरू शकत नाही, परंतु 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या समर्थकांवर कारवाई करण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते.

PM Modi criticized Congress over Mani Shankar Aiyars statement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात