Modi New Cabinet : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता एकूण 43 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये नवीन आणि जुने अशा दोन्ही मंत्र्यांचा समावेश असेल. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळाबाबत ‘आज तक’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार नव्या मंत्रिमंडळात कास्ट फॅक्टरचीही काळजी घेण्यात आली आहे. नव्या मंत्रिमंडळात 27 ओबीसी आणि एससी-एसटीचे 20 मंत्री असल्याची चर्चा आहे. यात महिला आणि राज्यांकडे विशेष लक्ष दिल्याने या मंत्रिमंडळात मिनी इंडियाची झलक पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. PM Modi Cabinet Expansion Modi New Cabinet Will Show Mini India, Tried to achieve Social Engineering
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता एकूण 43 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये नवीन आणि जुने अशा दोन्ही मंत्र्यांचा समावेश असेल. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळाबाबत ‘आज तक’ने वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार नव्या मंत्रिमंडळात कास्ट फॅक्टरचीही काळजी घेण्यात आली आहे. नव्या मंत्रिमंडळात 27 ओबीसी आणि एससी-एसटीचे 20 मंत्री असल्याची चर्चा आहे. यात महिला आणि राज्यांकडे विशेष लक्ष दिल्याने या मंत्रिमंडळात मिनी इंडियाची झलक पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात 12 मंत्री मागास प्रवर्गातील असतील. यातील प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या एससी समुदायातील असेल. 12 मंत्र्यांपैकी दोन मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 8 मंत्री अनुसूचित जमातीचे असणार आहेत.
27 मंत्री ओबीसी समाजातील असतील. यापैकी 19 हे अतिमागास प्रवर्गातील जसे की यादव, कुर्मी, जाटव, शिंपी, कोळी आणि वोक्कलिगा या समुदायातील असतील. ओबीसी समुदायातील 5 मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकते. – 5 मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील असतील. यामध्ये 1 मुस्लिम, 1 शीख, 2 बौद्ध आणि 1 ख्रिश्चन समाजातील असतील. याशिवाय ब्राह्मण, भूमिहार, कायस्थ, क्षत्रिय, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील 29 मंत्री असतील.
मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात 11 महिलांनाही स्थान मिळणार आहे. यातील दोन महिलांना कॅबिनेट दर्जा देण्यात येईल. हे नवीन मंत्रिमंडळ आधीच्या मंत्रिमंडळापेक्षा जास्त तरुण असेल. या मंत्रिमंडळात 14 मंत्री असे असतील ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. यापैकी 6 जणांना कॅबिनेट मंत्री केले जाईल. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय 58 वर्षे होणार आहे.
पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात मागास आणि अतिमागास समाजाचे प्रतिनिधित्व राहील याची विशेषत्वाने काळजी घेण्यात आली आहे. गत निवडणुकीत ओबीसींनी मोठा पाठिंबा दर्शविला. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी ‘अबकी बार, ओबीसी सरकार’ असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून सरकारकडून मागासवर्गीयांना महत्त्व दिले जात आहे, असा संदेश यातून देण्यात येऊ शकतो.
PM Modi Cabinet Expansion Modi New Cabinet Will Show Mini India, Tried to achieve Social Engineering
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App