मेहूल चौक्सीमुळे अ‍ॅँटिगा- बाबुर्डातील राजकारणात खळबळ, निवडणूक निधीसाठी विरोधकांना चोक्सीचा पुळका आल्याचा पंतप्रधानांचा आरोप


फरार हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याने अ‍ॅँटिगा आणि बाबुर्डा या देशातील राजकारणात चांगलीच खळबळ उडविली आहे. येथील विरोधी पक्ष असलेली युनायटेड प्रोग्रेसिव्ह पार्टी निवडणूक निधी मिळावा यासाठी मेहूल चोक्सीचा पुळका आल्याचा आरोप पंतप्रधान गस्तोन ब्राऊनी यांनी केला आहे.PM accuses Mehul Chauksi of stirring up politics in Antigua-Baburda


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : फरार हिरे व्यापारी मेहूल चोक्सी याने अ‍ॅँटिगा आणि बाबुर्डा या देशातील राजकारणात चांगलीच खळबळ उडविली आहे. येथील विरोधी पक्ष असलेली युनायटेड प्रोग्रेसिव्ह पार्टी निवडणूक निधी मिळावा यासाठी मेहूल चोक्सीचा पुळका आल्याचा आरोप पंतप्रधान गस्तोन ब्राऊनी यांनी केला आहे.

ब्राऊनी यांनी म्हटले आहे की मेहूल चोक्सी याच्यावर इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, तरीही विरोधी पक्षांकडून सूडबुध्दीने माझ्या प्रशासनावर आरोप केले जात आहेत



चोक्सी याच्यावरील आरोप मागे घेऊन त्याला पवित्र करून घेण्याची विरोधकांची मागणी ही केवळ निवडणूक निधीवर डोळा ठेऊन आहे. चोक्सी याचे नागरिकत्व रद्द करण्याचे आमच्य सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यामध्ये कायदेशिर अडचणी आणल्या जात आहेत.

ब्राऊनी म्हणाले, आम्ही चोक्सीचे नागरिकत्व रद्द करून त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास तयार आहोत. भारतामध्ये त्याच्यावर गुन्हेगारी खटला चालविला जाईल. यामध्ये चोक्सीच्या कोणत्याही कायदेशिर आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झालेले नाही.

दरम्यान, युनायटेड प्रोग्रेसिव्ह पार्टीने म्हटले आहे की प्रत्येक नागरिकाला घटनात्मक अधिकार आहे. कायदेशिर प्रक्रियांचे पालन करूनच पुढील निर्णय घ्यावा.भारताकडे सोपविण्यासाठी चोक्सीला त्याच्या इच्छेविरुध्द डॉमिनिकाला नेण्यात आले.

तेथे त्याला अटक करण्यात आली. त्यामध्ये घटनात्मक आणि कायदेशिर बाबींचा भंग झाला आहे. पंतप्रधान ब्राऊनी चोक्सीला अ‍ॅँटीगाला आणण्याऐवजी थेट डॉमिनिकमधूनच भारताकडे सोपविण्याच्या तयारीत आहेत.

याचे कारण म्हणजे येथे आणल्यास त्याला घटनात्मक अधिकार द्यावे लागतील.पंजाब नॅशनल बँकेची 13500 कोटींची फसवणूक करणारा मेहुल चोक्सी अँटिगा आणि बाबुर्डा या कॅरेबियन बेटावरुन फरार झाला होता. त्याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे.

अँटिगा-बाबुर्लाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी यांनी सांगितले होते की, हा अत्यंत दुदैर्वी निर्णय आहे.दरम्यान डोमिनिका येथील मेहुल चौक्सीचे वकील मार्श वेन यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, आज सकाळी पोलिस स्टेशनमध्ये मेहुलची भेट झाली.

वकिलाच्या म्हणण्यानुसार, अपहरण करुन डोमेनिका येथे आणण्यात आले असा आरोप मेहुलने केला आहे. तसेच आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्याने केला आहे. मेहुल चौकसीला दिलासा मिळावा यासाठी त्याचे वकील न्यायालयात अपील दाखल करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच मेहुल चोक्सी अँटिगा आणि बाबुर्डा येथून फरार झाला होता. त्यानंतर इंटरपोलने त्याच्या विरोधात यलो नोटीस जारी केली होती. या नोटीसनंतर डोमिनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

बुधवारी मेहुलच्या अटकेच्या बातमीनंतर अँटिगा आणि बाबुर्डाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊनी म्हणाले की, मेहुल चोकसीला अँटिगाकडे न सोपवण्यास सांगितले आहे. मेहुलला भारतात पाठवण्याची गरज आहे. त्यामुळे त्याला भारताकडे देण्यास डोमिनिका सरकारला सांगितले आहे.

PM accuses Mehul Chauksi of stirring up politics in Antigua-Baburda

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात