कॉँग्रेस नेतृत्व काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड करत आहे. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुदैर्वी आहे. भाजपसाठी राष्ट्रीय सुरक्षा सर्वप्रथम आहे, अशी टीका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी पंजाब काँग्रेसमधील घडामोडींवरून केली आहे. Piyush Goyal targets Congress leadership for compromising national interest for some gain
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: कॉँग्रेस नेतृत्व काही फायद्यासाठी राष्ट्रीय हितसंबंधांशी तडजोड करत आहे. काही लोकांच्या राजकीय फायद्यासाठी काँग्रेस राष्ट्रीय हितांशी तडजोड करत आहे, हे अत्यंत दुदैर्वी आहे. भाजपसाठी राष्ट्रीय सुरक्षा सर्वप्रथम आहे, अशी टीका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी पंजाब काँग्रेसमधील घडामोडींवरून केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी ट्विटद्वारे सतत केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यावरून गोयल यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष राहुल गांधींना गांभीर्याने कधीच घेत नाही. आपल्याच सरकारांना काँग्रेस नेतृत्व रोज अस्थिर करत आहे. काँग्रेस नेतृत्व राष्ट्रीय चिंतांपासून तुटले आहे. राजकीय निर्णय घेताने राष्ट्रीय सुरक्षेचा विचार करेल, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये जे काही घडतंय त्यावरून मी खूप चिंतेत आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा आमच्यासाठी प्रथम आहे. सर्व प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि शेवटी आपण येतो. आम्ही या तत्त्वावर काम करतो. पंतप्रधान मोदींच सरकार आणि भाजप याच विचाराने काम करते, असे गोयल म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App