Nizamabad case : NIAने दाखल केले दुसरे आरोपपत्र; PFIने मुस्लीम तरुणांना भडकवत दिले शस्त्र प्रशिक्षण!

NIA

दुसऱ्या आरोपपत्रात पाच आरोपींची नावं आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  तेलंगणातील निजामाबाद प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. ताज्या आरोपपत्रात असे म्हटले आहे की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) चे कॅडर मुस्लीम तरुणांना भडकावणे आणि कट्टरपंथी बनवणे, बंदी घातलेल्या संघटनेत त्यांची भरती करणे आणि खास आयोजित प्रशिक्षण शिबिरांमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण देणे यात गुंतलेले आढळले आहेत. PFI imparts weapons training in specifically organized camps says NIA  second chargesheet in Nizamabad case


छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईडी’ची नऊ ठिकाणी छापेमारी!


राष्ट्रीय तपास संस्थेने हैदराबाद येथील एनआयए विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून, त्यात शेख रहीम उर्फ ​​अब्दुल रहीम, शेख वाहिद अली उर्फ ​​अब्दुल वाहिद अली, जफरउल्ला खान पठाण, शेख रियाझ अहमद आणि अब्दुल वारिस या पाच आरोपींची नावे आहेत. आरोपींचा आयपीसीच्या कलम १२०बी, १५३ए आणि यूए(पी) कायदा १९६७ च्या कलम १३(१)(बी), १८, १८ए आणि १८बी अंतर्गत आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.

यापूर्वी डिसेंबर २०२२ मध्ये एनआयएने पहिले आरोपपत्र दाखल केले होते. निजामाबाद प्रकरणात तेलंगणा पोलिसांनी गेल्यावर्षी ४ जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, ऑगस्ट २०२२ मध्ये, तेलंगणा पोलिसांकडून तपास हाती घेतल्यानंतर, NIA ने या प्रकरणातील ११ आरोपींविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले.

PFI imparts weapons training in specifically organized camps says NIA  second chargesheet in Nizamabad case

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात