विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या (इव्हीएम) विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना न्यायालयाने धडा शिकविला आहे. इव्हीएमबाबत संशय घेणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यासोबतच हा प्रसिध्दी स्टंट असल्याचे म्हणत याचिकाकर्त्याला दहा हजार रुपये दंड केला आहे.Petitioner slammeded for questioning EVM’s credibility, fined Rs 10,000 for publicity stunt
याचिका फेटाळून लावत दिल्ली उच्च न्यायालयाने या याचिकेला प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी दाखल केलेली याचिका म्हटले आणि याचिकाकत्यार्ला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आगामी निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरने घेण्यात याव्या, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान याचिकाकत्यार्ने म्हटले आहे की, जगातील अनेक देशांमध्ये ईव्हीएमऐवजी पुन्हा एकदा बॅलेट पेपरद्वारे निवडणुका सुरू झाल्या आहेत. ज्या देशांनी ईव्हीएम सुरूवात केली, ते सुद्धा पुन्हा बॅलेट पेपर निवडणुका घेत आहेत. आपल्या देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांचा सुद्धा ईव्हीएमवर विश्वास नाही. फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे.
सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने याचिकाकत्यार्ला विचारले की, असे काय आहे, ज्या आधारे तुम्ही हे सांगत आहात की, ईव्हीएममध्ये अडथळा येऊ शकतो. यावर याचिकाकत्यार्ने म्हटले आहे की, जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएमचा वापर असंवैधानिक घोषित केला आहे. यावर याचिकाकत्यार्ने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले, परंतु त्यांच्याकडे ईव्हीएमबद्दल काही खास माहितीही नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App