विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे मृत्यू झाले. विरोधकांनी मोदी सरकारवर त्याचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विरोधकांच्या या कोल्हेकुईला तरुणांनी मानलेले नाही. यूगव्ह- टीबीईन- सीपीआर मिलेनियल सर्व्हेक्षणात हे स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा या संकटानंतरही कायम आहे.People refuses to blame Modi government for second wave of Corona
जागतिक स्तरावरील संशोधन संस्था यूगोव्ह आणि दिल्लीतील थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) यांच्या संयुक्त विद्यमान हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये अर्ध्याहून अधिक नागरिक हे २५ ते ४० वर्षांचे होते, उर्वरित चाळीसपेक्षा जास्त आणि १८ ते २४ या वयोगटातील होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्राण गेले. यासाठी सरकारला जबाबदार ठरविण्यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. रुग्णालये आणि ऑक्सिजन पुरवठा केंद्राबाहेर रांगा, स्मशानभूमीत प्रतीक्षा लिबरल मीडियाने वाढवून दाखविली. मात्र, या सर्वेक्षणानुसार शहरी भागातील नागरिक या शोकांतिकेसाठी राज्य किंवा केंद्र सरकारला दोष देऊ इच्छित नाहीत.
जून ते जुलै या कालावधीत 203 शहरांमधील 10,285 नागरिकांच्या केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात दिसून आले आहे की 41% लोक म्हणतात की कोरोनाच्या दुसºया लाटेतील शोकांतिकेसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत. परंतु त्यापेक्षा जास्त 48% लोकांनी पंतप्रधानांना अजिबात दोष दिलेला नाही. त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही या आपत्तीसाठी जबाबदार धरले गेले नाही.
विरोधक आणि लिबरल मीडियाने मोदी सरकारविरुध्द रान उठवूनही सर्वेक्षणात हे निकाल कसे आले याचे कारणही देण्यात आले आहे. त्यामध्ये पहिले कारण म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सरकारपेक्षा जनतेलाच अनेकांनी दोष दिला आहे. दुसरे म्हणजे हे संकट प्रत्यक्षापेक्षा सोशल मीडियावरच जास्त होते. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरित परिणाम झाले नाहीत.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १२ टक्के नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. २६ टक्के लोकांनी केंद्र सरकारला दोष दिला आहे. मात्र, ४४ टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की लोकांनीच कोरोनाच्या नियमावलीचे पालन केले नाही. सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट जास्त तीव्र झाली.कुटुंबाचा आधार हाच साथीच्या काळात लोकांसाठी महत्वाचा होता. कौटुंबिक पातळीवर सर्वाधिक मदत मिळाली. त्याचबरोबर सोशल मीडियावरूनही मदत मिळाली.
कोरोनाच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून सर्वाधिक मदत मिळाली असे ३० टक्के लोकांनी म्हटले आहे. कॉँग्रेसकडून मदत मिळाल्याचे केवळ सहा टक्के लोकांनी सांगितले. इतर पक्षांकडून मात्र पुरेशी मदत मिळालेली नाही असे बहुतांश लोकांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App