जेव्हापासून मानवाला अवकाशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, तेव्हापासून इतर जग आणि तेथे राहणारे परग्रहवासीय यांच्या अस्तित्वाबाबत वाद सुरू झाला आहे. काहींच्या मते ही केवळ काल्पनिक गोष्ट आहे, तर काहींच्या मते एलियन्स केवळ बाहेरच्या जगातच नाही, तर मानवी रूपातही आपल्यासोबत राहतात.Pentagon report Aliens have come to Earth, some women became pregnant due to relationship Worldwide outcry over US agency claim
वृत्तसंस्था
पेंटागॉन : जेव्हापासून मानवाला अवकाशाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, तेव्हापासून इतर जग आणि तेथे राहणारे परग्रहवासीय यांच्या अस्तित्वाबाबत वाद सुरू झाला आहे. काहींच्या मते ही केवळ काल्पनिक गोष्ट आहे, तर काहींच्या मते एलियन्स केवळ बाहेरच्या जगातच नाही, तर मानवी रूपातही आपल्यासोबत राहतात. यूएफओ आणि एलियन्स पाहिल्याचा दावाही अनेकदा करण्यात आला आहे. एलियन्सशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रेही आहेत. या सगळ्या दरम्यान अमेरिकेच्या पेंटागॉनने एक खळबळजनक खुलासा केला आहे.
Former Pentagon official Lue Elizondo tells Tucker Carlson about the adverse effects people reportedly experienced after seeing UFOs. pic.twitter.com/I0QLmywfpY — The Post Millennial (@TPostMillennial) April 7, 2022
Former Pentagon official Lue Elizondo tells Tucker Carlson about the adverse effects people reportedly experienced after seeing UFOs. pic.twitter.com/I0QLmywfpY
— The Post Millennial (@TPostMillennial) April 7, 2022
पेंटागॉनने अॅडव्हान्स्ड एव्हिएशन थ्रेट आयडेंटिफिकेशन प्रोग्राम (एएटीआयपी) मधील 1,500 हून अधिक पृष्ठांचे वर्गीकरण केले आहे. या अहवालांमुळे एलियन्सच्या अस्तित्वाच्या दाव्याला आणखी बळ मिळाले आहे. अहवालात, एलियन्सने पृथ्वीवरील महिलांना गर्भवती करून त्यांच्या ग्रहावर फिरवण्यापर्यंतच्या घटनांचा उल्लेख केला आहे. माहिती स्वातंत्र्याच्या विनंतीवरून संरक्षण गुप्तचर संस्थेने या फाइल्स जारी केल्या आहेत.
‘द सन’च्या वृत्तानुसार, एएटीआयपीच्या अहवालात एलियनद्वारे गर्भधारणेच्या एकूण पाच घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या महिलांची ओळख लपवण्यात आली आहे. इतकंच नाही तर एलियन्स किंवा यूएफओच्या संपर्कात येणं मानवांसाठी खूप धोकादायक असल्याचंही या रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. अशा सर्व प्रकरणांमध्ये मानवाची हानी झाली आहे. यूएफओमधून निघणाऱ्या किरणोत्सर्गामुळे काही जण दगावले आहेत, तर काहींच्या मेंदूचे आणि मज्जासंस्थेचे नुकसान झाले आहे.
एजन्सीच्या अहवालानुसार, एलियन्सशी संबंधित 42 प्रकरणे त्यांच्याकडे नोंदवण्यात आली आहेत. हे लोक पुढे आले आणि त्यांनी स्वतःला एलियन किंवा यूएफओद्वारे संपर्क साधण्यात आल्याचे सांगितले होते. मात्र अशी आणखी तीनशे प्रकरणे आहेत, जी अद्याप समोर आलेली नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App