केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम ही हायटेक टेक्नोलॉजी आणणार आहे.Pensioners’ worries allayed; No proof of being alive
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ईपीएफओ आता बऱ्याच अंशी डिजिटल होत आहे.पीएफ जमा करणे, बॅलन्स, काढण्यापासून ते आधारकार्ड, पॅनकार्ड आदींची माहिती ऑनलाईन अपडेट करता येते.परंतु दरवर्षी पेन्शनधारकांना दरवर्षी जिवंत असल्याचा म्हणजेच हयातीचा ऑफलाईन दाखला द्यावा लागतो. हा दाखला दिला नाही तर त्यांची पेन्शन बंद केली जाते. पण पेन्शनधारकांची आता टेन्शन पासून मुक्तता होणार आहे.
पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम
पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर पेन्शनधारक असाल तर तुम्हाला येत्या काळात हयात (जिवंत) असल्याचा दाखला देण्याची गरज नाही.त्यासाठी केंद्र सरकारनं एक वेगळी योजना आखलीय.केंद्र सरकार लवकरच पेन्शनधारकांसाठी फेस रेकगनायझेशन सिस्टम ही हायटेक टेक्नोलॉजी आणणार आहे.
टेक्नोलॉजी नुसार आता पेन्शधारकाचा चेहरा हाच जिवंत असल्याचा पुरावा असेल. राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांच्या हस्ते या नव्या तंत्रज्ञानाचं अनावरण करण्यात आलं.वयोमानामुळे अनेक पेन्शनधारकांना बँकेत जाता येत नाही, कागदपत्रांची पुर्तता करता येत नाही. त्यामुळे ही नवी टेक्नॉलॉजी पेन्शनधारकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App