पेगॅससद्वारे हेरगिरी करण्याच्या संभाव्य यादीमध्ये केंद्रीय मंत्री, ४० हून अधिक पत्रकार , वायरची माहिती

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पेगॅससद्वारे हेरगिरी करण्यात आलेल्या संभाव्य यादीमध्ये काही केंद्रीय मंत्री, ४० हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षांचे नेते, एक न्यायाधीश, उद्योगपती आदी ३०० जणांचा समावेश असल्याचे `द वायर`ने प्रसिद्ध केलेल्या माहितीत म्हटले आहे. Pegasis software used against 300 peopels

फरार उद्योगपती नीरव मोदीचे वकील आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील कथित दलाल ख्रिस्तियन मिशेलचे वकील यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांचा समावेश इस्रायली स्पायवेअर पेगॅससच्या संभाव्य लक्ष्यांच्या सूचीमध्ये समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.`द वायर`ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.



सर्वोच्च न्यायालयातील रजिस्ट्रीमधील दोन अधिकारी एन. के. गांधी आणि टी. आय. राजपूत यांचे दूरध्वनी क्रमांकांचा समावेश २०१९ मधील हेरगिरी करण्यात आलेल्या संभाव्य यादीत आहे. या यादीत शेकडो क्रमांकांचा समावेश आहे. त्यातील काही क्रमांकांची हेरगिरी करण्यात आल्याचे बोलण्यात येते.

लीक झालेल्या डेटाबेसमध्ये माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या चेंबरमध्ये काम करणारे वरिष्ठ वकील एम. थंगदुराई यांचेही नाव आहे. रोहतगी यांनी अॅटर्नी जनरलपद सोडल्यानंतर या क्रमांकाचा समावेश हेरगिरीच्या संभाव्य यादीत करण्यात आला होता. जगभरातील ५० हजार जणांवर अशा प्रकारे पाळत ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातो. यातील काही प्रकरणांच्या चौकशीचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने दिले आहेत.

Pegasis software used against 300 peopels

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात