शेतकऱ्यांचा कँडल मार्च; सिंघू, टिकरी सीमेवर बॅरिकेड्स हटवणे सुरू; शेतकऱ्याचा मृतदेह 4 दिवस रुग्णालयात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीत मोर्चा काढण्याचा निर्णय 29 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यानंतर हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शांतता आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याच्या आवाहनानंतर, पोलिसांनी 13 फेब्रुवारीला बंद केलेला राष्ट्रीय महामार्ग-44 चा सर्व्हिस रोड दिल्ली सीमेवरून खुला करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली पोलीस सर्व्हिस रोडवरील चारही मार्गिका उघडत आहेत. त्याचवेळी बहादूरगडमध्ये पोलिसांनी टिकरी सीमेवरील बॅरिकेड्स हटवण्याचे काम सुरू केले आहे.Peasants’ Candle March; Singhu, Tikri border barricades removed; Farmer’s body in hospital for 4 days



दरम्यान, शेतकरी नेते रणनीती आखण्यात व्यग्र आहेत. खानोरी हद्दीतील तरुण शेतकरी शुभकरण यांचा मृतदेह चौथ्या दिवशीही रुग्णालयातच होता. शुभकरणच्या हत्येला जबाबदार असलेल्यांवर पंजाब सरकारने खुनाचा गुन्हा दाखल करावा, यावर शेतकरी नेते ठाम आहेत. दुसरीकडे, जखमी शेतकरी प्रीतपाल यांच्यावर रोहतक पीजीआयमध्ये उपचार सुरू आहेत. शनिवारी शेतकरी आंदोलनातील मृतांसाठी कँडल मार्च काढला.

शेतकरी परतू लागले, सीमेवर निम्मी संख्या

दोन्ही आघाड्यांवरून तरुण शेतकरी परतत आहेत. शंभू सीमेवर पहिल्या दिवशी 10 हजार शेतकरी होते, आता फक्त 6000 उरले आहेत. दुर्गम जिल्ह्यांतून आलेले शेतकरी पाय रोवून आहेत, जवळचे शेतकरी बोलावल्यावर परत येऊ, असे सांगून घरी परतत आहेत.

Peasants’ Candle March; Singhu, Tikri border barricades removed; Farmer’s body in hospital for 4 days

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात