वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पेटीएमच्या शेअरने उसळी घेतली.मुंबई ;पेटीएमच्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे.Paytm’s stock surges; Big advantage of RBI decision
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा दिला आहे. हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ अंतर्गत घेण्यात आला आहे. शेड्यूल्ड पेमेंट बँक झाल्याने आता पेटीएम नवीन व्यवसाय संधींवर लक्ष केंद्रित करू शकते.
मागील काही सत्रात घसरणीचा सामना करत असलेल्या पेटीएमच्या शेअरने रिझव्र्ह बँकेच्या या निर्णयामुळे जवळपास ५ टक्क्यांची उसळी घेतली. रिझर्व्ह बँकेने सप्टेंबरमध्येच हा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याची अधिसूचना जारी केली होती, पण पेटीएम पेमेंट्स बँकेने गुरुवारी (९ डिसेंबर) याची घोषणा केली आहे.
पेटीएमने गुंतवणूकदारांना केले खूश
अलीकडेच पेटीएमने त्यांचा महाआयपीओ (IPO) आणला होता. पण, कंपनीला बाजारात लोकांकडून खूप वाईट प्रतिसाद मिळाला. त्यांचा आयपीओ देखील घसरणीसह लिस्ट (सूचीबद्ध) झाला होता. काही दिवसांतच पेटीएमच्या शेअरची घसरण ४१ टक्क्यांवर पोहोचली. पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर शेअरची किंमत सुमारे ५ टक्क्यांनी वाढून १,६४५ रुपये झाली. त्याआधी पेटीएमचा शेअर लाल चिन्हात व्यवहार करत होता.
पेटीएमला काय फायदा होणार?
याचा पहिला फायदा कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या उसळीच्या रूपात दिसून आला. आता शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर, पेटीएम पेमेंट्स बँक सरकार आणि इतर मोठ्या कॉर्पोरेशनच्या प्रस्तावाच्या विनंतीमध्ये (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) सहभागी होऊ शकेल. त
सेच प्राथमिक लिलावातही हजेरी लावता येणार आहे. त्यासोबतच निश्चित दर (फिक्स्ड रेट) आणि परिवर्तनीय रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये देखील भागीदार बनता येईल. इतकेच नाही, तर ते मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीसाठी भागीदार बनू शकतील.
मुंबई : पेटीएमच्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल पेमेंट्स बँकेचा दर्जा दिला आहे. हा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ अंतर्गत घेण्यात आला आहे. शेड्यूल्ड पेमेंट बँक झाल्याने आता पेटीएम नवीन व्यवसाय संधींवर लक्ष केंद्रित करू शकते.
अलीकडेच पेटीएमने त्यांचा महाआयपीओ (IPO) आणला होता. पण, कंपनीला बाजारात लोकांकडून खूप वाईट प्रतिसाद मिळाला. त्यांचा आयपीओ देखील घसरणीसह लिस्ट (सूचीबद्ध) झाला होता. काही दिवसांतच पेटीएमच्या शेअरची घसरण ४१ टक्क्यांवर पोहोचली.
पेटीएम पेमेंट्स बँकेला शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर शेअरची किंमत सुमारे ५ टक्क्यांनी वाढून १,६४५ रुपये झाली. त्याआधी पेटीएमचा शेअर लाल चिन्हात व्यवहार करत होता.
याचा पहिला फायदा कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या उसळीच्या रूपात दिसून आला. आता शेड्यूल्ड बँकेचा दर्जा मिळाल्यानंतर, पेटीएम पेमेंट्स बँक सरकार आणि इतर मोठ्या कॉर्पोरेशनच्या प्रस्तावाच्या विनंतीमध्ये (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) सहभागी होऊ शकेल.
तसेच प्राथमिक लिलावातही हजेरी लावता येणार आहे. त्यासोबतच निश्चित दर (फिक्स्ड रेट) आणि परिवर्तनीय रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये देखील भागीदार बनता येईल. इतकेच नाही, तर ते मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीसाठी भागीदार बनू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App