Payal Rohatgi Arrested : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. Payal Rohatgi Arrested By Ahmedabad Police For Threatening Her Society Chairperson
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री पायल रोहतगीला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तिच्यावर आहे.
सोसायटीच्या चेअरमनने पायल रोहतगीविरोधात तक्रार दाखल केली होती. पायलवर असा आरोप आहे की, सोसायटीची सदस्य नसतानाही ती 20 जून रोजी सभेत गेली होती आणि तिने भांडण केले. यावेळी तिने चेअरमनसह अनेकांना शिवीगाळ केली. लहान मुले सोसायटी खेळत असल्यावरून तिने उपस्थित सर्वांशी वाद घातला होता.
पायल रोहतगीला सन 2019 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात तिने गांधी-नेहरू परिवारावर अभद्र वक्तव्य केले होते. पायलच्या अशा वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी आधी तिचे अकाउंट ब्लॉक केले होते. या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी पायलला अहमदाबाद येथून अटक केली होती. मात्र, या प्रकरणात तिला जामीन मिळाला होता.
Payal Rohatgi Arrested By Ahmedabad Police For Threatening Her Society Chairperson
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App