एलजेपीचे दोन भागांत विभाजन झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर एलजेपीच्या बंडखोर गटाचे नेते पशुपती पारस यांची गुरुवारी पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. pashupati paras Elected president of ljp in meeting of Partys national council in Patana Bihar
विशेष प्रतिनिधी
पाटणा : एलजेपीचे दोन भागांत विभाजन झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर एलजेपीच्या बंडखोर गटाचे नेते पशुपती पारस यांची गुरुवारी पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली.
पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक एलजेपी नेते सुरजभान सिंह यांच्या घरी बोलविण्यात आली होती. या बैठकीत अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. ज्यामध्ये केवळ पशुपती पारस यांनीच अर्ज दाखल केला होता. अशा परिस्थितीत पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. पक्षाचे नेते सूरजभान सिंह यांनी पत्रकार परिषदेदरम्यान याची घोषणा केली. या वेळी बंडखोर गटाचे सर्व नेते उपस्थित होते.
पक्षाच्या मालकीवरून चिराग पासवान आणि काका पशुपती पारस यांच्यात वाद झाला आहे. पक्षात पाच खासदार असल्याने पक्षाची कमांड स्वत:च्या हातात घेण्याचा पशुपती पारस यांनी मूड बनविला आहे. तथापि, चिराग आपले पद सोडण्यास तयार नाहीत.
अशा परिस्थितीत पशुपती पारस बुधवारी पाटण्याला पोहोचले आणि गुरुवारी बैठक बोलविण्यात आली. ज्यामध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. परंतु खासदार प्रिन्स राज यांनी बैठकीस हजेरी लावली नाही. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, पशुपती पारस गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षावर पकड बनवण्याच्या तयारीत होते. खुद्द चिराग यांनीही ही वस्तुस्थिती मान्य केली आहे. त्यांनी आपले काका पशुपती पारस यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
खा. पशुपती पारस यांचे म्हणणे आहे की, त्यांनी पक्ष तोडलेला नाही, तर जपला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात येऊ लागले होते. अशा परिस्थितीत रामविलास पासवान यांचा पक्ष आणि त्यांची विचारसरणी वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर पशुपती गटात सहभागी नेत्यांचेही हेच म्हणणे आहे.
pashupati paras Elected president of ljp in meeting of Partys national council in Patana Bihar
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App