PM Modi in Assam : आसाममधील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त विविध सभा घेत आहेत. शनिवारी त्यांनी आसामच्या तामुलपूरमध्ये सभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे भाजप कार्यकर्ते व समर्थकांसाठी दक्षता दिसून आली. या मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना एक भाजप कार्यकर्ता बेशुद्ध झाला. यावर पंतप्रधानांनी लगेच त्यांच्या मदतीसाठी डॉक्टरांची टीम पाठविली. Party Worker fainted during the speech of PM Modi in Assam, immediately PMO sent Medical team for help
विशेष प्रतिनिधी
तामुलपूर : आसाममधील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त विविध सभा घेत आहेत. शनिवारी त्यांनी आसामच्या तामुलपूरमध्ये सभा घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींचे भाजप कार्यकर्ते व समर्थकांसाठी दक्षता दिसून आली. या मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरू असताना एक भाजप कार्यकर्ता बेशुद्ध झाला. यावर पंतप्रधानांनी लगेच त्यांच्या मदतीसाठी डॉक्टरांची टीम पाठविली.
#WATCH: During a rally in Assam's Tamalpur, PM Narendra Modi asked his medical team to help a party worker who faced issues due to dehydration.#AssamAssemblyPolls pic.twitter.com/3Q70GPrtWs — ANI (@ANI) April 3, 2021
#WATCH: During a rally in Assam's Tamalpur, PM Narendra Modi asked his medical team to help a party worker who faced issues due to dehydration.#AssamAssemblyPolls pic.twitter.com/3Q70GPrtWs
— ANI (@ANI) April 3, 2021
पंतप्रधान मोदी या रॅलीला संबोधित करत होते. त्याचवेळी बहुधा पाणी न प्यायल्याने एक भाजप कार्यकर्ता बेशुद्ध झाला होता. पंतप्रधानांचे तिकडे लक्ष जाताच त्यांनी आपले भाषण थांबवले आणि त्यांच्या तैनातीत असलेल्या वैद्यकीय पथकाला मंचावरूनच मदत करण्याची सूचना केली. मंचावरून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पीएमओच्या मेडिकल टीमने तेथे जावे. बहुधा पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना त्रास झालाय, त्यांची त्वरित मदत करा.’ ते म्हणाले की, जे डॉक्टर माझ्याबरोबर आले आहेत, त्यांनी त्या सहकाऱ्याची मदत करावी. त्यांना पाण्याच्या कमतरतेमुळे त्रास झालाय.
यानंतर पंतप्रधान मोदींनी पुन्हा आपले भाषण सुरू केले. त्यांनी सभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘देशात काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत, जर आम्ही समाजात भेदभाव केला, समाजाचे तुकडे करून आपल्या व्होटबँकेसाठी काही दिले, तर दुर्भाग्य पाहा, त्याला देशात सेक्युलॅरिझम म्हणतात. पण जर आम्ही प्रत्येकासाठी काम केले, कोणताही भेदभाव पाळला नाही, तर त्याला मात्र हे कम्युनल म्हणतात.’ ते म्हणाले की, आमचा तर मंत्रच आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. हा जो सेक्युलॅरिझम-कम्युनलचा खेळ आहे, यानेच देशाचे मोठे नुकसान केलेले आहे.
Party Worker fainted during the speech of PM Modi in Assam, immediately PMO sent Medical team for help
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App