रॉकेटरी – थलायवीचे ट्रेलर लाँचचे टायमिंग आणि मोदींची भाषणे काय सांगतात??


विनायक ढेरे

नाशिक : केरळ – तामिळनाडूतला निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला असताना थलायवी आणि रॉकेटरी या सिनेमांचे ट्रेलर लाँच होणे… त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात महिला सन्मान आणि नंबी नंबियार, केरळमधील प्रोफेशनल्स यांचा उल्लेख असणे हे नेमके काय सांगतात…roketary and thalivai trailors are election breakevens in kerala and tamilnadu

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री केरळमध्ये तिरूअनंतपूरमध्ये केरळमधल्या प्रचाराचे अखेरचे भाषण केले. ते प्रचाराच्या फाफटपसारा भाषणापेक्षा अधिक concentrated होते आणि त्यातला टार्गेट ऑडियन्स पक्का केला होता,



केरळमधला प्रोफेशनल वर्ग, प्रथमच मतदान करणारा वर्ग आणि महिला. या भाषणात त्यांनी रॉकेट सायंटिस्ट नंबी नंबियार यांचे नाव घेतले. ते जाताजाता किंवा सहज घेतलेले नाही. किंबहुना त्यांनी ते प्रथमच घेतले असेही नाही.

पण कालच्या भाषणाच्या विशेष असा की नेमके कालच रॉकेटरी या नंबी नंबियार यांच्या बायोपिकच्या ट्रेलरचेही लाँच झाले. यामुळे मोदींनी नंबियारांचे नाव घेण्यालाही महत्त्व प्राप्त झाले. रॉकेटरीच्या ट्रेलरला यूट्यूबर प्रचंड प्रतिसाद मिळतोय आणि मतदानाच्या दिवसापर्यंत त्याचे व्ह्यूज मिलेनियम्सचा आकडा ओलांडताना दिसतील.

जसा प्रतिसाद रॉकेटरीला मिळतोय तसाच तो थलायवीच्या म्हणजे जयललिता यांच्या बायोपिकच्या ट्रेलरलाही मिळतोय. तामिळ आणि हिंदीतही. या दोन्ही सिनेमांच्या ट्रेलरचे लाँचिग टायमिंग आणि भाजपच्या प्रचाराची दिशा विशेषतः मोदींच्या भाषणांमधला कन्टेंट यांच्यातले साम्य केरळ आणि तामिळनाडू यांच्या राजकीय बदल सांगताहेत. ते “डोळे उघडून नीट वाचता” मात्र आले पाहिजेत.

डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या रोड शोची मोठी गर्दी रस्त्यावर दिसते आहे. पण त्यांचे दुसऱ्या फळीतले नेते ऐन मोक्याच्या क्षणी राजकीय चूका करीत आहेत. आणि त्याचवेळी थयलवीच्या ट्रेलरला, त्यातल्या गाण्यांमधल्या टीझर्सना मोबाईल स्क्रीनवर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.

हा अण्णा डीएमके – भाजप युतीचा प्रचार डीएमकेच्या समजण्याच्या “कक्षेबाहेर”चा आहे आणि त्यांना समजला तरी त्यावर तोड काढण्यासाठी त्यांच्याकडे वेळ उरलेला नाहीए. इथेच तामिळनाडू विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालाचे इंगित दडलेले असू शकते.

केरळमध्ये बुध्दिवादी वर्गाला आकर्षण

केरळमधल्या बुध्दिवादी वर्गाला आणि तरूणाईला भाजपने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्याचे आव्हान पेलले आहे. भाजपच्या प्रचाराचे नेमके हेच वेगळेपण आहे. डाव्यांच्या बुध्दिवादी जाळ्यातून त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्न पूर्वी होत नव्हते असे नाही,

पण आत्ताचे प्रयत्न आणि तेव्हाचे प्रयत्न यांच्यात फार मोठा फरक आहे आणि तो स्थानिक बुद्धिवादी नेत्यांच्या आणि घटकाच्या भाजपमधल्या सहभागाचा आहे. इ. श्रीधरन यांचे वयाच्या ८८ वर्षी उभरते नेतृत्व हे त्याचे प्रतिक आहे.

मल्याळी सुपरस्टार मोहनलाल यांनी श्रीधरन यांना पाठिंबा दिला आहे. ही सहज घडलेली गोष्ट नाही. यामागे concentrated efforts आहेत. आणि फलद्रूप होताना दिसत आहेत. केरळमधला डाव्यांचा बौध्दिक आधाराला परिणामकारक टक्कर देण्याचा हा प्रयत्न आहे.

सगळ्या राष्ट्रीय मीडियाने केवळ पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रीत केल्याने केरळ आणि तामिळनाडूत मायक्रो लेव्हलला होणारे बदल त्यांना टिपता येत नाहीत किंवा त्यांचे या बदलांकडे दुर्लक्ष होते आहे.

पण २ मे रोजी याचे परिणाम दिसण्याची दाट शक्यता आहे. आणि मग हे परिणाम कसे आश्चर्यकारक आहेत… केरळ आणि तामिळनाडूच्या पारंपरिक राजकारणाला कसे छेद देणारे आहेत, याची वर्णने आणि डिबेट हाच राष्ट्रीय मीडिया करायला सुरूवात करेल.

roketary and thalivai trailors are election breakevens in kerala and tamilnadu

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात