विशेष प्रतिनिधी
पणजी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अंश आहेत. महर्षी अरविंद यांची कल्पना होती की एखादी व्यक्ती सुपर ह्युमन बनू शकते आणि मोदी ते सुपर ह्युमन आहेत, असे कौतुक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.Part of God in Narendra Modi, Maharshi Arvind’s super human idea proved true because of him, Shivraj Singh Chouhan appreciated
गोव्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री चौहान यांनी गोव्याचा अर्थ सांगितला. ते म्हणाले, नरेंद्र मोदी हे एक अद्भूत व्यक्तिमत्त्व असून असामान्य व्यक्ती असे वर्णन केले. मी हे केवळ यामुळे म्हणत नाही की एक मुख्यमंत्री आणि भाजपाचा कार्यकर्ता आहे.
ही गोष्ट मी अनुभवत आहे. आपले सर्वांचे भाग्य आहे की आपल्याला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून लाभले आहे. त्यांचे व्यक्तीमत्व विश्वसनिय आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा गौरव वाढविला आहे. जेव्हा कॉँग्रेस सत्तेवर होती तेव्हा विदेशी लोक आपली उपेक्षा करत.
भारतातून आलेल्यांचा कोणीही सन्मान करत नाही. केवळ भ्रष्टाचारासारख्या मुद्यावर भारताची चर्चा व्हायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास केला. त्यामुळे भारताचा जगात मान-सन्मान वाढला आहे.
शिवराजसिंह चौहान म्हणाले, मोदींमध्ये अनंत शक्तींचे भांडार आहे. एक व्यक्ती इतकी कामे कशी करू शकतो. कॉँग्रेस अनेक वर्षे सत्तेवर होती. परंतु, त्यावेळी हा विकास कधी पाहिला का?चौहान यांनी गोव्याचा अर्थही सांगितला. जी तो म्हणजे ग्लोरियस, ओ म्हणजे आउटस्टँडिंग आणि अ म्हणजे आशा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App