वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा याने अखेर काल रात्री उशिरा दिल्ली पोलिसांपुढे सरेंडर केले. Parliament attack mastermind Lalit Jha surrenders before police
संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित मोहन झा याने दिल्ली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची एएनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.
13 डिसेंबर रोजी संसदेत घुसखोरी करणाऱ्या 2 आरोपी आणि त्यांच्या 2 साथीदारांना गुरुवारी पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने चौघांनाही 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दुसरीकडे, सुरक्षेतील त्रुटींमुळे संसद सचिवालयाने गुरुवारी 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. रामपाल, अरविंद, वीर दास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित आणि नरेंद्र अशी त्यांची नावे आहेत.
या घटनेनंतर संसदेच्या आत आणि बाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. गुरुवारी संसदेच्या आत जाणाऱ्यांची बूट काढून तपासणी करण्यात आली. दरम्यान, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना मकर गेटमधून इमारतीत प्रवेश देण्यात आला नाही. त्यानंतर संगमा कारमधून खाली उतरले आणि शार्दुल गेटमधून संसदेत गेले.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पोहोचून केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकूर उपस्थित होते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी यापूर्वीही संसदेबाहेर रेकी केली होती. सर्व आरोपी भगत सिंग फॅन क्लब या सोशल मीडिया पेजशी संबंधित होते. आरोपींकडे पंतप्रधान मोदी “मिसिंग” असल्याची पत्रके आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुमारे दीड वर्षांपूर्वी सर्व आरोपी म्हैसूरमध्ये भेटले होते. आरोपी सागर जुलैमध्ये लखनऊहून दिल्लीत आला होता, पण संसद भवनात प्रवेश करू शकला नाही. 10 डिसेंबरला प्रत्येक जण आपापल्या राज्यातून दिल्लीला पोहोचला.
घटनेच्या दिवशी सर्व आरोपी इंडिया गेटजवळ जमले होते, तेथे सर्वांना कलर स्प्रे वाटण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार संसदेच्या सुरक्षा भंगाचा मुख्य सूत्रधार दुसराच कोणीतरी म्हणजे ललित झा आहे.
या 5 पात्रांशिवाय आणखी एक नाव समोर आलं आहे. ते म्हणजे ललित झा, जो हरियाणाचा रहिवासी आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नव्हती. तो फरार होता. पण त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पदके पाठवली. काही ठिकाणी छापेमारी केली. काल रात्री ललित हा येणे दिल्ली पोलिसांपुढे शरणागती पत्करली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App