वृत्तसंस्था
इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे 5 जवान शहीद झाले. तेव्हापासून पाकिस्तान घाबरला असून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकची भीती त्याला सतावत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी ही माहिती दिली. भारत लवकरच आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.Pakistan panicked after Poonch attack, fear of another ‘surgical strike’
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, “20 एप्रिलला जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये भारतीय जवानांवर हल्ला झाला. तेव्हापासून भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, अशी चर्चा पाकिस्तानात आहे. अब्दुल बासित यांनी याबाबतचा व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी या प्रकरणावर आपले म्हणणे मांडले आहे.
काय म्हणाले अब्दुल बासित?
व्हिडिओमध्ये बासित म्हणतात, “पाकिस्तानमधील लोक भारताकडून आणखी एक सर्जिकल स्ट्राइक किंवा एअर स्ट्राइकबद्दल बोलत आहेत. तथापि, मला वाटत नाही की पुन्हा असे होईल, कारण भारत यावर्षी SCO बैठक आणि G20चा अध्यक्ष आहे. जोपर्यंत ते एससीओचे अध्यक्ष आहेत, तोपर्यंत भारत कोणतेही गैरप्रकार करणार नाही, परंतु पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांदरम्यान भारत ते पुन्हा करू शकतो. भारतात निवडणुकांच्या आधी हे होऊ शकते.
बासित यांनी केले दहशतवादी हल्ल्याचे समर्थन
यानंतर बासित पुंछमधील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करू लागतात. ते म्हणाले, “ज्याने हे केले, मग तो मुजाहिदीन असो वा अन्य कोणी. त्यांनी नागरिकांना नव्हे तर लष्कराला लक्ष्य केले आहे. ते न्याय्य संघर्षात गुंतलेले आहेत. तुम्ही आंदोलन करत असाल तर तुम्ही लष्कराला लक्ष्य करत आहात, पण नागरिकांना नाही. आंतरराष्ट्रीय कायदा देखील याची परवानगी देतो. आपण कुठे उभे आहोत हे भारताला माहीत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी अब्दुल बासित यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे. खरं तर, 20 एप्रिल रोजी अज्ञात दहशतवाद्यांनी राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछमधून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले होते. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते, लष्कराने या घटनेबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहीद जवान हे राष्ट्रीय रायफल्सचे होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App