पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-2024 ची बैठक यावर्षी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे होणार आहे. यासाठी पाकिस्तानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले की, SCO ची बैठक १५ ते १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. बैठकीत सहभागी होणाऱ्या देशांच्या प्रमुखांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
Swapnil Kusale : ‘आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे, आपण… ‘ ; ऑलम्पिक पदक विजेत्या स्वप्निल कुसाळेंचं वक्तव्य!
भारत आणि चीनसोबतच पाकिस्तानही शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचा पूर्ण सदस्य आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, काही राष्ट्रांनी SCO मध्ये सामील होण्याची पुष्टी केली आहे. या बैठकीत कोणते देश सहभागी होतील आणि कोणते देश नाही हे वेळ जवळ आल्यावरच स्पष्ट होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये अनेक दिवसांपासून तणाव आहे. काश्मीरचा प्रश्न आणि पाकिस्तानातून वाढणारा दहशतवाद हे त्याचे प्रमुख कारण आहे.
SCO शिखर परिषदेपूर्वी मंत्रीस्तरीय बैठका होणार आहेत. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकाही होणार आहेत. भारतासोबतच्या संबंधांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, पाकिस्तानचा भारताशी थेट द्विपक्षीय व्यापार नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App