विशेष प्रतिनिधी
चंडीगड : स्वातंत्र दिनाच्या सुमारास घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट पोलिसांनी हाणून पाडला आहे. अमृतसर जवळील एका गावातून पोलिसांनी दोन किलो आरडीएक्स स्फोटके असलेला ‘टिफिन बॉम्ब’ जप्त केला आहे. सीमेपलीकडून ड्रोनद्वारे हा बॉम्ब टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. Pakistan drops Tifin Bomb from Drone in Punjab
पोलिस म्हणाले, ‘‘टिफिन बॉम्बसोबत इतर स्फोटकेही मिळाली आहेत. यात हातबॉम्ब आणि काही काडतुसांचा समावेश आहे. पाकिस्तानी बाजूकडून सात पिशव्यांद्वारे हे सर्व साहित्य पाठविण्यात आले आहे.’’
‘‘अमृतसरजवळील एका गावांत सात-आठ ऑगस्ट रोजी एक ड्रोन दिसल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते. तसेच त्याद्वारे काही तरी वस्तू खाली पडल्याचा आवाजही लोकांनी ऐकला होता. याची माहिती गावकऱ्यांना पोलिसांना दिली होती. त्याच्या आधारे तपास केल्यानंतर स्फोटकांचा साठा आढळून आला. या घटनेची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही देण्यात आली आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांत शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे गुप्ता यांनी सांगितले
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App