पाकिस्तानला आलं डोकं ठिकाणावर!, भारतासोबत व्यवसाय सुरू करण्यास उत्सुक

लंडनमधील पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलं विधान Pakistan came to the right place eager to start business with India

विशेष प्रतिनिधी

लंडन : पाकिस्तानचे नवे सरकार भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याचे संकेत देत आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी भारतासोबत व्यापार सुरू करण्याची त्यांच्या सरकारची इच्छा व्यक्त केली आहे. 2019 मध्ये, भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35A रद्द केले होते. तेव्हापासून पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार बंद केला होता.

लंडनमधील पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतासोबत व्यापार पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा केली. परराष्ट्रमंत्री दार अणुऊर्जा शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी येथे आले आहेत. परराष्ट्र मंत्री इशाक दार म्हणतात की, पाकिस्तान भारतासोबत व्यापार करण्यास उत्सुक आहे. त्यांचे हे वक्तव्य राजनैतिक धोरण आणि भारताबाबतच्या दृष्टिकोनात मोठ्या बदलाचे संकेत देते.

भारत-पाकिस्तान संबंधांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दार म्हणाले, ‘आम्ही भारतासोबतच्या व्यापारविषयक बाबींवर गांभीर्याने विचार करू.’ दार यांचे हे विधान नवीन सरकारच्या पाच वर्षांच्या रोडमॅपचा भाग आहे, ज्यामध्ये भारतासह शेजारी देशांसोबत व्यापार आणि व्यवसायाचे आर्थिक कॉरिडॉर उघडण्यावर आणि पाकिस्तानसाठी आर्थिक सुधारणांचा मार्ग मोकळा करण्यावर भर आहे.

Pakistan came to the right place eager to start business with India

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात