पाकने रशियाचा केला विश्वासघात : गहू-तेल रशियाकडून घेतले, स्वत:ची शस्त्रास्त्रे मात्र जर्मनीमार्गे युक्रेनला पाठवली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत असलेल्या पाकिस्तानला रशियाने नुकतीच गहू पाठवून मदत केली. आता पाकिस्तानने मात्र रशियाचा विश्वासघात केल्याचे वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, पाकिस्तानने युक्रेनला दारूगोळा पुरवठ्यासाठी ब्रिटनशी करार केला आहे. हा करार पाकिस्तान सरकारच्या मालकीच्या पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीजशी करण्यात आला आहे.Pakistan betrayed Russia: took wheat and oil from Russia, but sent its own weapons to Ukraine via Germany

करारानुसार, रॉकेटसह दारूगोळ्याच्या 162 कंटेनरची खेप फेब्रुवारीमध्ये कराची बंदरातून एमव्ही जस्ट जहाजाद्वारे जर्मनीमार्गे युक्रेनला पाठवण्यात आली आहे. रशियाने जहाजातून गव्हाची मोठी खेप पाकिस्तानला पाठवल्यामुळेही त्याची चर्चा होत आहे. आता रशियन कच्च्या तेलाची खेपही पाकिस्तानात पोहोचणार आहे.



ब्रिटन-पोलंडशी करार

रशियासोबत वर्षभर चाललेल्या युद्धात युक्रेनला दारूगोळा पुरवल्याप्रकरणी पाकिस्तानचे नाव समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ब्रिटनने एअर ब्रिजद्वारे युक्रेनला शस्त्रे पाठवली होती, तेव्हा पाकिस्तानही त्यात सहभागी होता. युक्रेनला दारूगोळा पोचवण्यासाठी ब्रिटनशिवाय एका पोलंड कंपनीनेही पाकिस्तानी कंपनीशी करार केला आहे. कॅनेडियन कंपनी या प्रक्रियेत मध्यस्थ आहे.

पाकिस्तानने पोलंडला खांद्यावरून वापरता येणारी हवाई संरक्षण प्रणाली अनजा मार्क 2 ची खेप निर्यात केली आहे. ते युक्रेनला दिले जाणार आहे. एअर ब्रिज म्हणजे इतर देशांच्या तुलनेत कमी धोका असलेल्या देशांच्या हवाई हद्दीतून जाणे. ब्रिटनने पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी येथील नूर खान हवाई तळाचा वापर करत युक्रेनला दारुगोळा आणि शस्त्रे नेण्यासाठी केला.

युक्रेन पाकचे हेलिकॉप्टर अपग्रेड करणार

दारूगोळ्याच्या बदल्यात युक्रेनने पाकिस्तानला त्यांची एमआय-17 हेलिकॉप्टर अपग्रेड करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. विमानाच्या इंजिनसह औद्योगिक सागरी वायू टर्बाइनच्या निर्मितीशी संबंधित युक्रेनची कंपनी पाकिस्तानला हेलिकॉप्टर अपग्रेड करण्यात मदत करत आहे.

Pakistan betrayed Russia: took wheat and oil from Russia, but sent its own weapons to Ukraine via Germany

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात