वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या बहिणीचा नवरा आणि कुख्यात दहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. गेल्या वर्षी भारताने अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. पण त्यावेळेला चीनने नकाधिकाराचा वापर करत भारताच्या मागणीवर आक्षेप घेतला होता. मात्र चीनची आक्षेप धुडकावत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीने अब्दुल रहमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताच्या प्रयत्नांना 7 महिन्यांत यश आले आहे. संयुक्त राष्ट्र संघातले भारताचे कायमचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली आहे. Pak-based terrorist Makki had more to him than just being Hafiz Saeed’s brother-in-law
पाकिस्तानात लपून बसलेल्या अब्दुल रहमान मक्कीला सोमवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. सुरक्षा परिषदेच्या समितीने आयएसआयएल, अल-कायदा आणि संबंधित व्यक्ती, गट, संस्थांशी संबंधित १२६७ (१९९९), १९८९ (२०११) आणि २२५३ (२०१५)च्या अधीन राहून मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी यादीत नमूद केले आहे. संयुक्त राष्ट्राने निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव २६१० (२०२१)च्या परिच्छेद १मध्ये मालमत्ता गोठवणे, प्रवास बंदी आणि शस्त्रास्त्र निर्बंध नमूद केले आहेत. अल-कायदा अंतर्गत बंदी घातलेल्या यादी व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्राच्या सातव्या अध्याय अंतर्गत बंदी घातली आहे.
भारत आणि अमेरिकापूर्वी अब्दुल रहमान मक्कीला आपल्याच देशातील कायद्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होतेच. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीने त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करणे याला विशेष महत्त्व आहे.
Pak-based terrorist Makki had more to him than just being Hafiz Saeed's brother-in-law. Find out Read @ANI Story | https://t.co/3j2NoBz1SZ#GlobalTerrorist #Pakistan #China #India #AbdulRehmanMakki #UN #Explainer pic.twitter.com/ulF3Rh039V — ANI Digital (@ani_digital) January 17, 2023
Pak-based terrorist Makki had more to him than just being Hafiz Saeed's brother-in-law. Find out
Read @ANI Story | https://t.co/3j2NoBz1SZ#GlobalTerrorist #Pakistan #China #India #AbdulRehmanMakki #UN #Explainer pic.twitter.com/ulF3Rh039V
— ANI Digital (@ani_digital) January 17, 2023
भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये मक्कीचा हात होता. ज्यामध्ये टेरर फंडिंग, तरुणांची भरती करणे आणि हिंसाचारासाठी कट्टरपंथी बनवणे. तसेच महत्त्वाचे म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ल्यांची योजना करण्यात समाविष्ट करणे, अशा प्रकारचे मक्की काम करत होता. अब्दुल रहमान मक्की हा लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि २६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मेहुणा आहे.
अब्दुल रहमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणे ही केवळ एकच बाब नाही, तर आणखी असे अनेक दहशतवादी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होण्याच्या यादीत आहेत. त्यामध्ये साजिद मीर, अब्दुल रौफ अझर, शाहीद मेहमूद आणि तलाह सईद यांचा समावेश आहे. हे आजही पाकिस्तानात राहत आहेत. पाकिस्तानने त्यांना आश्रय दिला आहे.
मौलाना मसूद अजहर सारख्या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारताला अनेक वर्षे प्रयत्न करावे लागले. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताची मागणी मान्य केली नव्हती. अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर ही मागणी अखेर मान्य झाली. पण अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी मात्र 7 महिन्यात पूर्ण झाली. याचा अर्थ भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा दबदबा किती वाढला आहे हेच यातून स्पष्ट होते.
Earlier it took us more than a decade to designate Masood Azhar & now it took us 7 months to designate Abdul Rehman Makki. You can now see the level of pressure India is mounting now & is a success: Syed Akbaruddin pic.twitter.com/BkXkVf9h3m — ANI (@ANI) January 17, 2023
Earlier it took us more than a decade to designate Masood Azhar & now it took us 7 months to designate Abdul Rehman Makki. You can now see the level of pressure India is mounting now & is a success: Syed Akbaruddin pic.twitter.com/BkXkVf9h3m
— ANI (@ANI) January 17, 2023
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App