वृत्तसंस्था
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले शिवतीर्थावर मोदींनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांच्या समवेत राज्यपाल भगतसिंग कोशियारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे होते.
पंतप्रधान मोदींनी लतादीदींच्या भगिनी आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर वैजनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर आदी मंगेशकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
Paid my last respects to Lata Didi in Mumbai. pic.twitter.com/3oKNLaMySB — Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
Paid my last respects to Lata Didi in Mumbai. pic.twitter.com/3oKNLaMySB
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, क्रिकेट सुपरस्टार सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, शंकर महादेवन, भरत बलवल्ली आदींनी पुष्पहार आणि पुष्पचक्र वाहून लतादीदींच्या कार्टून श्रद्धांजली वाहिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App