पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

नाशिक : पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच दहशतवाद्यांनी पहलगाम मध्ये हिंदू पर्यटकांवर हल्ला करण्याची हिंमत केली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना टीआरएफने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली असली, तरी त्यात केवळ एका दहशतवादी संघटनेचे हात असण्यापेक्षा त्यामागचे कारस्थान अधिक मोठे आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी हिंदू समाजाविरोधात केलेल्या हेट स्पीच नंतर दहशतवाद्यांना चिथावणी मिळाली आणि त्यांनी मुद्दाम हिंदू पर्यटकांवर हल्ला केला. पर्यटकांना त्यांनी नावे विचारून गोळ्या घातल्या. Pahalgam terror attack

पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर देशभरात प्रचंड संताप उसळला असून लोकांना पुलवामा हल्ल्याची आठवण झाली. त्याचवेळी लोकांच्या मनात सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक यांच्या आठवणीही जाग्या झाल्या. त्यामुळेच मोदी सरकारने आता दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पुरस्कर्त्यांना सर्जिकल आणि एअर स्ट्राइक यांच्या पेक्षाही जबरदस्त तडाखा हाणण्याची अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार श्रीनगरमध्ये दाखल झाले असून त्यांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे‌. डी. व्हान्स भारताच्या दौऱ्यावर आलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेत. या पार्श्वभूमीवर जम्मू कश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य फार मोठे आहे. काश्मीर मधल्या दहशतवाद्यांनी बऱ्याच दिवसांनी विषारी फणा वर काढताना अमेरिकन उपाध्यक्षांचा दौरा आणि भारतीय पंतप्रधानांचा परदेश दौरा यांचे “पॉलिटिकल टायमिंग” निवडून भारतीय सुरक्षा दलांना वेगळे आव्हान दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या आव्हानाचे गांभीर्य वेळीच ओळखले. त्यांनी सौदी अरेबियातूनच गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून प्रत्यक्ष घटनास्थळी जायला सांगितले, इतकेच नाही तर दहशतवाद्यांची नांगी ठेचण्याचा निर्धारही त्यांनी तिथून व्यक्त केला.



जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर केंद्रातल्या मोदी सरकारने तिथे विविध कल्याणकारी योजना राबवून राज्यातली परिस्थिती कमालीची सुधारली. राज्यात लोकशाही प्रक्रियेनुसार पंचायत निवडणुकांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत सर्व निवडणुका यशस्वी करून दाखविल्या. प्रत्येक निवडणुकीतल्या मतदानाची टक्केवारी वाढती राहिली. जम्मू काश्मीर मधली जनता लोकशाही प्रक्रियेमध्ये सरमिसळून गेली. मात्र त्याचवेळी दहशतवादी आणि त्यांचे “आका” वरवर शांत बसलेले दिसत असले, तरी त्यांची कारस्थाने आतून सुरू होती, हेच आजच्या पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यातून उघड झाले.

यापूर्वी दहशतवादी अमरनाथ यात्रा किंवा वैष्णोदेवी यात्रा सुरू होण्यापूर्वी पर्यटकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ले करायचे. त्यांची मोड्स ऑपरेंडी सुरक्षा दलांनी ओळखून उपाययोजना देखील केल्या होत्या. परंतु यावेळी मात्र अमेरिकेचे उपाध्यक्ष भारत दौऱ्यावर आलेले असतात आणि भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेलेले असताना दहशतवाद्यांनी “पॉलिटिकल टायमिंग” साधून पर्यटकांवर हल्ला केला. जम्मू कश्मीर मधून दहशतवाद संपलेला नाही. तिथले 370 कलम हटविले असले तरी आणि तिथे कितीही कल्याणकारी योजना राबविल्या असल्या तरी, आम्ही विषारी फणा वर काढल्याशिवाय राहणार नाही, हा धमकीवजा संदेश देण्याचा त्यांनी यातून प्रयत्न केला.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काहीच दिवसांपूर्वी इस्लामाबाद मध्ये ओव्हरसीज पाकिस्तान्यांच्या मेळाव्यात भारताविरुद्ध गरळ ओकणारे भाषण केले होते. जम्मू काश्मीर पाकिस्तानचा अभिन्न भाग असल्याचा दावा करून त्यांनी जगातली कोणतीही ताकद जम्मू-काश्मीरला पाकिस्तान पासून अलग करू शकणार नाही, अशी दमबाजी केली होती. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ हे निमुटपणे पाकिस्तानी लष्कर प्रमुखाचे भाषण ऐकत स्वस्थ बसले होते. असीम मुनीर यांच्या भाषणाला शहाबाज शरीफ यांनी मुक संमती दिली होती. पाकिस्तानी लष्कर प्रमुखाच्या भाषणातूनच दहशतवाद्यांना चिथावणी मिळाली आणि त्यांनी आज पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला केला.

– सर्जिकल स्ट्राइक कधी करणार??

मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना ज्या प्रकारे सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केले होते, त्यानंतर दहशतवाद्यांची नांगी ठेचली गेली होती. पाकिस्तान सुद्धा हबकला होता पण आता पाकिस्तान आणि दहशतवादी या दोघांनीही विषारी फणा वर काढून पुन्हा सर्वसामान्य हिंदू पर्यटकांना टार्गेट केले. मोदी सरकारला मोठे आव्हान दिले. या आव्हानाचा मुकाबला मोदी सरकार कसे करणार हे पाहणे??, हे पाहणे येत्या काही दिवसांत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक यांच्यापेक्षा जबरदस्त हल्ल्याची जनतेकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

Pahalgam terror attack; all Indians expecting furious attack than surgical and air strikes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात