स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात केजरीवालांच्या घरातून पीए बिभव कुमारला अटक; राघव चढ्ढा पोलिस ठाण्यात दाखल!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरात मारहाण करणाऱ्या त्यांचा पीए बिभव कुमार याला अखेर दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्याच घरातून अटक केली. त्याला सोडवण्यासाठी आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार रागावू चढ्ढा सिविल लाईन पोलीस ठाण्यात हजर झाले. PA Bibhav Kumar arrested from Kejriwal’s house in Swati Maliwal beating case

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात वेगवेगळी राजकीय वळणे आली. स्वाती मालीवाल यांनी दिलेल्या जबानीच्या आधारावर दिल्ली पोलिसांनी एफ आय आर नोंदविला त्यानंतर मेडिकल रिपोर्ट आला. त्या आधारे पोलिसांनी बिभव कुमारला अटक केली आहे, पण आम आदमी पार्टीने भाजप आणि स्वाती मालीवाल यांच्यावरच कट कारस्थान रचल्याचे आरोप केले. स्वाती मालीवाल यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून भाजपनेच केजरीवाल यांच्या विरोधात मोठे कारस्थान रचले, आरोप केला.

स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्यानंतर त्यांचे दोन व्हिडिओ समोर आले. त्या मुद्द्यावर खासदार संजय सिंग, मंत्री आतिशी मार्लेना हे बोलले, पण केजरीवालांनी एकूणच या सगळ्या प्रकरणावर गप्प बसणे पसंत केले. ते उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र असे दौरे करत राहिले, पण स्वाती मालीवाल प्रकरणात त्यांनी एक अवाक्षरही उच्चारले नाही. बिभव कुमार दोशी असेल तर त्यावर कारवाईचे आश्वासन केजरीवालांनी दिल्याचे वक्तव्य संजय सिंग यांनी केले, पण त्याच्या दुसऱ्या दिवशी विभव कुमार केजरीवाल्यांबरोबर लखनऊ दौऱ्यात दिसला.

दरम्यानच्या काळात प्रियांका गांधी यांनी स्वाती मालीवाल यांची बाजू उचलून धरली त्यामुळे काँग्रेस आम आदमी पार्टीच्या विरोधात गेली राष्ट्रीय महिला आयोगाने या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन बिभव कुमार आणि केजरीवाल पती-पत्नीला चौकशी आणि तपासण्यासाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली, पण त्यांनी ती नोटीस घेतली नाही. त्यामुळे दिल्ली पोलीस आणि राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमारच्या घरावर नोटीस चिकटवली. आज अखेरीस दुपारी पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरातून बिभव कुमारला अटक केली.

PA Bibhav Kumar arrested from Kejriwal’s house in Swati Maliwal beating case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात