१७७ कोटींची कॅश सापडली समाजवादी अत्तर बनवणाऱ्याकडे; नोटबंदीवरून ओवैसींचा प्रश्न मोदींना!!

वृत्तसंस्था

हैदराबाद : 177 कोटींची कॅश उत्तर प्रदेशात समाजवादी अत्तर बनवणारे व्यापारी पियुष जैन यांच्या घरांमध्ये सापडली आहे. त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. परंतु यावरून रंगलेल्या राजकीय नाट्यमध्ये हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे.Owisi questions demonetization of Modi

त्यांनी 177 कोटींची कॅश सापडलीच कशी?, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पाहिजे. कारण त्यांनी नोटबंदी केल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश त जमा झालीच कशी?, याचा अर्थ मोदींची नोटबंदी फसली आहे का?, याचे उत्तर त्यांनीच द्यावे, असे वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.



पियुष जैन यांनी समाजवादी अत्तर बनवले. त्याचे लॉन्चिंग समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी लखनऊ मध्ये समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात केले. त्यानंतर दीड दोन महिन्यांमध्येच पियुष जैन यांच्या घरावर प्राप्तिकर खात्याने छापे घातले. तेव्हा मोठे घबाड तेथे सापडले.

तब्बल 177 कोटी रुपयांची कॅश सापडली. त्यावरून उत्तर प्रदेशात राजकीय घमासान सुरू आहे. संबंधित कॅश ही जैनच्या उलाढालीतली आहे, असे कोर्टात केलेल्या सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये दिसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे पियुष जैन यांनी त्यावर कर भरला नसेल तर दंड भरून त्यांना जामीन मिळू शकतो, अशी चर्चा आहे.

परंतु 177 कोटी रुपयांची कॅश सापडण्याच्या मुद्द्यावर जे राजकारण सुरू झाले आहे त्या राजकारणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधून घेतला आहे.

परंतु आता यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी अखिलेश यादव यांना सोडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच नोटबंदीच्या मुद्द्यावर सवाल करून घेतला आहे. नोटबंदी लागू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश जमा होणे ही मोदींची नोटबंदी असल्याचे लक्षण आहे, असा दावा ओवैसी यांनी केला आहे.

Owisi questions demonetization of Modi

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात