विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : एरवी राज्यघटनेची दुहाई देत संपूर्ण देशभर फिरणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांनी अठराव्या लोकसभेमध्ये निवडून येताच आपले खरे रंग दाखवले. खासदारकीची शपथ घेताच ओवैसी यांनी लोकसभेत जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. त्यामुळे सभागृहात प्रचंड संताप उसळून हंगामा झाला. owaisi Sworn in as member of Lok Sabha for the fifth time
खासदारकीची शपथ घेतल्यानंतर असदुद्दीन ओवैसी जय भीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन म्हणाले, पण त्यांनी भारतमाता की जय म्हटले नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या बाकांवरचे खासदार प्रचंड चिडले आणि त्यांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतले हंगामी सभापती भरतृहरी मेहताब यांनी असदुद्दीन ओवेसी यांनी दिलेला जय पॅलेस्टाईन हा नारा कामकाजातून काढून टाकला.
Sworn in as member of Lok Sabha for the fifth time. Inshallah I will continue to raise issues of India’s marginalised with sinceritypic.twitter.com/OloVk6D65B — Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 25, 2024
Sworn in as member of Lok Sabha for the fifth time. Inshallah I will continue to raise issues of India’s marginalised with sinceritypic.twitter.com/OloVk6D65B
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) June 25, 2024
18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यादरम्यान त्यांनी संसदेत शपथविधी सोहळ्यात जय पॅलेस्टाईन म्हणत वाद निर्माण केला. प्रोटेम स्पीकर यांनी अससुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. बिस्मिल्लाचे पठण करून ओवैसी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी ‘जय भीम, जय तेलंगणा’ आणि नंतर ‘जय पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या. त्यावर भाजप खासदारांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
पाचव्यांदा निवडणूक जिंकली
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना एकूण 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या माधवी लता यांचा 3,38,087 मतांनी पराभव केला. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत ओवैसी यांनी एकूण 58.95% मतांसह विजय मिळवला होता.
या निवडणुकीत ओवैसी प्रत्येक ठिकाणी राज्यघटनेची दुहाई देत होते. मोदींच्या राजवटीत राज्यघटना धोक्यात आली आहे ते फक्त हिंदुत्वाचे शासन देशात आणू इच्छित आहेत असा आरोप ते सतत करत होते परंतु प्रत्यक्षात निवडून आल्यानंतर मात्र ओवैसी यांनी आपले खरे रंग दाखवले आणि लोकसभेत शपथ घेतल्यावर त्यांनी भारतमाता की जय असे म्हणण्याऐवजी जय पॅलेस्टाईनचा नारा दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App