कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारत अडचणीत आला आहे. मात्र, त्यावर मात करून भारत पुन्हा एकदा जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने पावले उचलेल असा विश्वास दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत शिंग-बॉँग किल यांनी व्यक्त केला आहे.Overcoming Corona, India will once again emerge as a world superpower, South Korean ambassadors believe
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारत अडचणीत आला आहे. मात्र, त्यावर मात करून भारत पुन्हा एकदा जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने पावले उचलेल असा विश्वास दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत शिंग-बॉँग किल यांनी व्यक्त केला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत बॉँग किल म्हणाले, भारतासारख्या महान देशामध्ये सेवा करायला मिळत आहे ही माझ्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे. भारत एक जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट भारतावर आले आहे.
मात्र, मला पूर्ण विश्वास आहे की भारत यातून बाहेर पडेल. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध कधी नव्हे तेवढे चांगले आहेत. कोरोनाच्या महामारीने दोन देशांना अधिक जवळ आणले आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे पंतप्रधान यांच्यातील विशेष नाते महत्वाचे ठरले आहे.
त्यामुळेच कोरोनाच्या महामारीत संपूर्ण जग असताना या दोन्ही देशांमध्ये नात्यांचे नवे बंध निर्माण झाले आहेत. कोरोनाच्या दुसºया लाटेत भारताला मदत म्हणून दक्षिण कोरियाने आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे.
शिंग-बॉँग किल म्हणाले, भारतातील अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांना आपण भेट दिली आहे. विशषत्वाने हैद्राबादमधील कोव्हॅक्सिन निर्मात्या भारत बायोटेक कंपनीला आपण भेट दिली. भारत बायोटेकने कोरयिातील काही कंपन्यांशी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
भारतीय लसींविषयी बोलताना शिंग-बॉँग किल म्हणाले केवळ भारताकडेच कोरोना लस संपूर्णपणे उत्पादित करण्याची क्षमता आहे. याचे कारण म्हणजे इतर देशांकडे हे तंत्रज्ञान किंवा आवश्यक साधनसामुग्री नाही.
भारतामध्ये कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना दक्षिण कोरियामध्ये प्रवेश दिला जाईल. त्यांना दोन आठवड्यांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करणेही गरजेचे राहणार नाही अशी नियमावली १ जुलैपासून करत आहोत. कोेव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना मात्र दोन आठवडे क्वारंटाईन व्हावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App