दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक यांची दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन मानवंदना… या घटनेचे नेमके महत्त्व काय…??

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय युध्द स्मारकाला भेट देऊन शहीद सैनिकांना मानवंदना दिली… या महत्त्वपूर्ण घटनेची प्रसार माध्यमांनी विशेष दखल घेतली नसली, तरी त्या घटनेचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. South Korea’s Minister of National Defence, Suh Wook pays tribute at the National War Memorial in Delhiकोणत्याही देशाचे पंतप्रधान अथवा संरक्षणमंत्री भारतात आले की साधारणपणे महात्मा गांधी समाधीचे दर्शन घेऊन तेथे पुष्पचक्र अर्पण करण्याची शासकीय प्रथा आहे. कोणत्याही देशाचे संरक्षणमंत्री आले तर संरक्षण मंत्रालयासमोर त्यांना मानवंदना देऊन स्वागत करण्याची शासकीय प्रथा आहे. ते संरक्षणमंत्री नंतर क्वचित इंडिया गेटवर जाऊन भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांच्या सेवेत असणाऱ्या शहीद भारतीय सैनिकांना मानवंदना अर्पण करतात. अर्थात ही प्रथा नाही. संबंधित देशाच्या संरक्षणमंत्र्यांच्या साधारण प्रोटोकॉलनुसार ही बाब पाळली जाते.

  • पण दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक यांनी प्रथमच राष्ट्रीय युध्द स्मारकाला भेट देऊन स्वतंत्र भारताच्या विविध लढाया आणि युद्धांमध्ये शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना मानवंदना दिली आहे.
  • आता भारतात सैनिकी प्रोटोकॉलमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्यापैकी कोणी प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन मानवंदना देण्याचा समावेश करण्यात आला आहे. या खेरीज १९७१ च्या युद्धाची स्मृती म्हणूनही युध्द स्मारकारवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा सुरू झाली आहे.
  • १९४८ पासून आत्तापर्यंत विविध युद्ध, लढाया आणि देशांतर्गत सैनिकी कारवायांमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या नातेवाइकांना राष्ट्रीय युध्द स्मारकावर दररोज सायंकाळी सन्मानाने निमंत्रित करून मानवंदना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे.
  • दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री सुह वूक यांच्या रूपाने कोणा परदेशी पाहुण्याने विशेषतः संरक्षणमंत्र्यांनी अधिकृत दौऱ्यावर येऊन राष्ट्रीय युध्द स्मारकाला भेट देऊन मानवंदना देण्यीच ही कदाचित पहिलीच वेळ आहे.

South Korea’s Minister of National Defence, Suh Wook pays tribute at the National War Memorial in Delhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*