विरोधी ऐक्याच्या बैठकीत अखेर जुन्या UPA पासून “सुटका”; नवे नाव INDIA!!; पण नाव बदलण्याचे यश कोणाचे??


नाशिक : विरोधी ऐक्याच्या तिसऱ्या बैठकीत अखेरीस जुन्या UPA (युपीए) अर्थात “युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स” पासून सर्व विरोधी पक्षांनी स्वतःची “सुटका” करून घेतली. युपीए 1 आणि युपीए 2 ही नावे कोळसा घोटाळ्यापासून टूजी घोटाळ्यापर्यंत जोडली गेल्याने विरोधकांना 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे अखेरीस काँग्रेस सह सर्व विरोधकांनी “यूपीए” हे नावच टाकून देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी आज INDIA (इंडिया) अर्थात “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इंक्लुसिव्ह अलायन्स” असे नवे नाव धारण केले आहे. Opposition unity had to change its name UPA as it was synonymous to corruption

हे नवे नाव राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी सुचविले आणि त्यानंतर 26 पक्षांच्या प्रादेशिक नेत्यांनी त्याला मान्यता दिली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी INDIA “इंडिया” या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत केली. मात्र बंगलोर मधल्या बैठकीत या नव्या “इंडिया” आघाडीचा संयोजक ठरवण्यात विरोधकांना अपयश आले. आता “इंडिया” या आघाडीची पुढची म्हणजे चौथी बैठक मुंबईत होणार असून तेथे आघाडीचा संयोजक ठरविण्यात येईल, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केले.

युपीए 1 आणि युपीए 2 या दोन आघाड्यांनी 2004 ते 2014 अशी 10 वर्षे देशावर राज्य केले होते. सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली ही आघाडी अस्तित्वात आली होती. सोनिया गांधी अखेरपर्यंत यूपीए चेअरपर्सन राहिल्या. म्हणजे युपीए अस्तित्वात असेपर्यंत त्या चेअरपर्सन राहिल्या. मध्ये शरद पवारांना यूपीए चेअर पर्सन करण्याचे पिल्लू संजय राऊत यांनी सोडून पाहिले पण काँग्रेस नेते त्याला बधले नव्हते. आजही INDIA च्या बैठकीला त्याच प्रमुख नेत्या होत्या.

मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा पंतप्रधान पदावरचा दावा आजच्या बैठकीत सोडला. त्यामुळे विरोधी ऐक्यातला महत्त्वाचा “काटा” काढला गेला आणि विरोधकांनी या बैठकीत INDIA या नावावर शिक्कामोर्तब केले.

पण त्यामागे युपीएचा राजकीय दृष्ट्या भ्रष्टाचाराचा आणि त्यामुळे झालेल्या पराभवाचा इतिहास दडला आहे. कॉमनवेल्थ कोळसा टू जी हे घोटाळे यूपीए नावाशी जोडले गेले होते. त्यामुळे UPA (यूपीए) आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराची आघाडी असे समीकरण बनविण्यात भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी झाले होते. युपीए हे नाव विरोधकांना ओझे बनले होते हे राजकीय ओझे आज विरोधकांनी उतरवले आणि स्वतःला INDIA हे नवे नाव धारण केले. त्यातही “राष्ट्रीय” म्हणजे “नॅशनल” हा शब्द आणण्यासाठी त्यांनी धडपड केली. कारण आधी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA आणि नंतर तीच आघाडी मोदींच्या नेतृत्वाखाली आज अस्तित्वात आहे. NDA (एनडीए) 25 वर्षे साजरी करत आहे. आजच राजधानी दिल्लीत 38 पक्षांची NDA बैठक घेत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA ने आपले नाव बदललेले नाही, तर यूपीए काँग्रेस प्रणित
UPA आघाडीचे नाव बदलून यांनी INDIA हे नाव धारण केले आहे.

  •  विरोधी आघाड्यांची नावे बदलली

सत्ताधारी आघाडीने नव्हे तर विरोधी आघाडीने नाव बदलण्याची परंपरा या निमित्ताने कायम राहिली आहे. 1971 च्या निवडणुकीत अशीच एक महाआघाडी तयार झाली होती. पण इंदिरा गांधी पुढे तिची डाळ शिजवू शकली नव्हती.

आता INDIA 1977 चा विरोधकांचा राजकीय परफॉर्मन्स रिपीट करू पाहत आहे. पण 1977 मध्ये विरोधी जनता पक्षाबरोबर जयप्रकाश नारायण होते. 2024 मध्ये काँग्रेस प्रणित INDIA आघाडी बरोबर नवे कोण “जयप्रकाश नारायण” येणार आणि त्यांच्यासाठी नैतिक बळ उभे करणार??, हा खरा प्रश्न आहे. पण या निमित्ताने बंगलोर मध्ये विरोधी ऐक्याच्या बैठकीत UPA विसर्जित करून INDIA आघाडीचा हा नवा राजकीय अवतार समोर आला आहे किंवा आणावा लागला आहे, हे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA चे यश आहे, असे मानावे लागेल.

Opposition unity had to change its name UPA as it was synonymous to corruption

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात