18 जुलैचा राजकीय योग : काँग्रेस फोडून शरद पवारांचे मुख्यमंत्रीपद ते विरोधी ऐक्यात काँग्रेस बरोबर सामील!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : 18 जुलै 2023 रोजी शरद पवारांचा राजकीय जीवनातला एक वेगळा योग साधला गेला. याच दिवशी 1978 रोजी मध्ये शरद पवारांनी काँग्रेस फोडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आजच 2023 मध्ये पवार काँग्रेसने पुढाकार घेतलेल्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत बंगलोर मध्ये सामील झाले आहेत.July 18 Political Yoga: Sharad Pawar’s Chief Ministership after breaking the Congress joins the opposition unity with the Congress!!

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 18 जुलै 1978 रोजी चा पवारांच्या शपथविधीचा “तो” फोटो ट्विट केला आहे मात्र त्यात त्यांनी शरद पवार काँग्रेस फोडून मुख्यमंत्री बनले, असे लिहिले नसून शरद पवार 37 व्या वर्षी मुख्यमंत्री बनले, एवढेच लिहिले आहे.



वास्तविक पवारांनी वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून काँग्रेसचे आमदार फोडून त्याच दिवशी 18 जुलै 1978 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि आज 18 जुलै 2023 रोजी ते विरोधी ऐक्याच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांसह सामील झाले आहेत. या बैठकीच्या वेळचे फोटो शरद पवारांनी आपल्या ट्विटर हँडल वरून शेअर केले आहेत. आपण एकजुटीने लढू आणि जिंकू असे त्यात वीट मध्ये नमूद केले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नेते राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या फोटोंचा त्यात समावेश आहे. इतकेच नाही तर डाव्या पक्षाच्या नेत्यांचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अभिनेत्यांच्या भेटी गाठी झाल्याचेही पवारांनी नमूद केले आहे.

पवारांच्या राजकारणाने काँग्रेस विरोधातून पूर्णपणे काँग्रेसकडे वळण्याचा आजचा दिवस ठरला आहे.

July 18 Political Yoga: Sharad Pawar’s Chief Ministership after breaking the Congress joins the opposition unity with the Congress!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात