रिमोट वोटिंग मशीनचे प्रात्यक्षिक पाहण्यापूर्वीच काँग्रेस सह विरोधकांचा त्यावर आक्षेप!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रिमोट वोटिंग मशीनचे प्रात्यक्षिक उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी सर्व राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसमोर करणार आहेत. देशातील स्थलांतरित कामगार, मजूर, नोकरदार या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी रिमोट वोटिंग मशीनची सोय करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिला आहे. उद्या या रिमोट वोटिंग मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. Opposition “unanimously” opposed Election Commission’s proposal of Remote Voting Machine

मात्र निवडणूक आयोगाची ही बैठक होण्यापूर्वीच काँग्रेसने आपल्या काही मित्र पक्षांसह रिमोट वोटिंग मशीनचा विरोध सुरू केला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत रिमोट वोटिंग मशीनला विरोध करण्याचा निर्णय सर्वांनी घेतल्याचे दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेसने बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, द्रमूक आणि त्याचे मित्र पक्ष, आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नव्हते. परंतु या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला अनुकूलता दर्शविल्याचे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. तृणमूळ काँग्रेसची भूमिका या संदर्भात अद्याप स्पष्ट झाली नसल्याचेही ते म्हणाले. मात्र सर्व विरोधी पक्षांचे सर्वसाधारण मत हे रिमोट वोटिंग मशीनच्या प्रस्तावाच्या विरोधातच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्थलांतरित नागरिकांची नेमकी संख्या आज उपलब्ध नाही. निवडणूक आयोगाचा त्यासंदर्भात तोच प्रस्ताव देखील नाही. त्यामुळे रिमोट वोटिंग मशीनचा नेमका उपयोग काय?, यावरचे प्रश्नचिन्ह कायम असल्याचे ते म्हणाले

उद्या निवडणूक आयोगाच्या प्रात्यक्षिक बैठकीत हा विरोध आयोगाकडे स्पष्टपणे नोंदवण्यात येईल, असे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

Opposition “unanimously” opposed Election Commission’s proposal of Remote Voting Machine

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात