Ganga Vilas River Cruise : मार्च २४ पर्यंत बुकिंग फुल! उंचे लोग, उंची पसंद; पण नो व्यसन!!


प्रतिनिधी

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत नुकतेच एमव्ही गंगाविलास रिव्हर क्रूझचे उद्धघाटन केले आहे. शुक्रवारी ३२ प्रवाशांना घेऊन हे जहाज प्रवाशाला रवाना झाले आहे. हे पर्यटन म्हणजे उंची लोग, उंची पसंद असणार आहे. प्रवासही अलिशान, आरामदायक असणार आहे, पण तिथे व्यसन नसणार आहे. Booking full height log, height preference; Luxury travel but no addiction!!

या संदर्भात अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझचे संस्थापक सीईओ राज सिंह यांनी एक बाब स्पष्ट केली, ती म्हणजे गंगा विलास रिव्हर क्रूझ वर नॉनव्हेज फूड आणि लिकर असणार नाही, तर गंगा किनाऱ्यावरील गावांमधील उत्तम स्थानिक शाकाहारी भोजन, पेये उपलब्ध असतील. सिझनल भाज्या, फळांचा आहारात समावेश असेल.

या क्रूझवर 35 वर्षांचा अनुभव असलेले महादेव नाईक हे कॅप्टन आहेत. मार्च 2024 पर्यंत या क्रूझचे बुकिंग फुल झाले आहे.

या क्रूझमध्ये जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदी घाट आणि बिहारमधील पाटणा, झारखंडमधील शाहीगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता या प्रमुख शहरांसह ५० पर्यटन स्थळांचा समावेश असेल. आसाम या राज्यातून प्रवास करत पुढे ती बांगलादेशमध्ये सुद्धा प्रवेश करणार आहे.

गंगा नदीच्या किनाऱ्यावर नागरिकांच्या उपजीविकेचे साधन ठरणाऱ्या या क्रूझच्या माध्यमातून संबधित परिसरातील पर्यटन क्षेत्रांचा विकास होणार आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या क्रूझला विरोध केला आहे. त्यांनी या क्रूझबाबत आरोप केला आहे. वाराणशी सारख्या पवित्र तीर्थ स्थळाला पर्यटनस्थळ करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

जनता दल यूनाटेड (जदयू)चे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनीही विरोध केला आहे. गंगा नदीची स्वच्छता करण्याच्या नावावर मोदी सरकार जनतेचा पैसा वाया घालवत आहेत. आमचा या क्रूझला विरोध आहे. आम्ही बिहारमध्ये या क्रूझला विरोध करणार, असा इशारा ललन सिंह यांनी दिला आहे. क्रूझच्या उद्धघाटन कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे गैरहजर होते.

संपूर्ण मार्गाचे भाडे प्रतिव्यक्ती ५० ते ५५ लाख रुपये आहे. १८ लक्झरी सूट्स. स्पा, सलून, आयुर्वेदिक मसाज, स्विमिंग पूल अशी सगळी अलिशान व्यवस्था केली आहे. ३६ प्रवाशांच्या पाहुणचारासाठी ४० जणांचा स्टाफ सज्ज आहे.

Booking full height log, height preference; Luxury travel but no addiction!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात